DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले आहेत. तर काही प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करित आहेत. कर्तव्यदक्ष म्हणून पोलीस महासंचालक संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) यांची ओळख आहे. पोलीस दलातील प्रत्येक पोलिसांपर्यंत आणि जनसामान्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा (Work Report) पांडे यांनी फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून दिला आहे. त्यामुळे त्यांचे पोलीस दलाबरोबरच इतरांकडून प्रशंसा होत आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडेय यांनी आज (रविवार) फेसबुक पोस्ट करुन आठवड्याभरात केलेल्या कामाची माहिती दिली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावरुन आपल्या कामाचा वर्क रिपोर्ट देणारे संजय पांडेय हे राज्यातील पहिलेच अधिकारी असावेत.

फेसबुकवर कामाची दिलेली माहिती

1. 35 ASI यांचे PSI म्हणून प्रमोशन केले.

2. हेड कॉन्स्टेबल ते RSI प्रमोशनची यादी तयार असून लोकांच्या विनंतीप्रमाणे जनरल बदल्या नंतर करण्यात येईल.

3. गडचिरोलीवरुन गट बदली सुरु करण्यात आली असून पुढच्या आठवड्यात 50 लोकांपर्यंत सोडता येईल.

4. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला प्रतिनियुक्तीवर गेलेल्या लोकांना 24 टक्के भत्ते मिळावेत ह्या करिता पाठपुरावा सुरु आहे.

5. गडचिरोलीला स्पेशल भरतीचे आदेश मिळाले असून भरती पुढच्या दोन महिन्यात होईल.

6. IRB अकोलासाठी नियुक्ती सुद्धा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून दोन महिन्यात होईल.

7. ग्रुप 4 चे प्रमोशन नागपूरला देण्यात असून इतर रेंजमध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यापर्यंत होतील.

8. RPI यांना DYSP चे प्रमोशन देण्याबाबत SRPF मध्ये DYSP साठी प्रमोशनचे 30 टक्के पदांमध्ये प्रमोशन देण्याबाबत विचार सुरु आहे.

9. PI ते DYSP प्रमोशन सर्व डिटेल्स शासनाला देण्यात आले असून पुढच्या आठवड्यात आदेश निघेल.

10. मेडिकल कारणावरुन समवर्ग बदली करुन काही पोलीस इन्स्पेक्टर/API यांना बदली देण्यात आली. अशी केलेल्या कामाचा तपशील संजय पांडेय यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

पोलिसांनी बळाचा वापर करु नये

प्रलंबित बाबी विचारधीन मुद्दे आणि सर्वसाधारण सूचना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पांडे यांनी दिले आहेत. येणाऱ्या बकरी ईदबाबत त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या असून पोलीस बंदोबस्तासाठी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना अजून संपला नाही. सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरून आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. शक्यतो गर्दी टाळा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तसेच पोलिसांना बळाचा वापर करु नका असा आदेश संजय पांडेय यांनी दिला आहे.

Web Titel :- DGP Sanjay Pandey | director general police himself gave work report on facebook

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?