DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर राज्य सरकारशी (Maharashtra government) तडजोड करण्यासाठी आपण दबाव आणला नाही, असे डीजीपी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी प्रतिज्ञापत्रात (Affidavit) म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्या अर्जावर आज सुनावणी सुरु असून महाराष्ट्र सरकारलाही उत्तर दाखल करावे लागणार आहे.

 

संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी म्हटले की, परमबीर सिंह यांनी स्वत: माझ्याशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की ते खूप तणावात आहेत आणि त्यांना हा प्रकरण संपवायचे आहे. त्यासाठी त्यांनी मदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांच्यासोबत बोललो. मला हे प्रकरण संपवण्यसाठी सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नव्हते. तसेच मी स्वत:हून हे प्रकरण संपवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. परमबीर सिंहांनी पूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडले असून त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन घेतला आहे.

दरम्यान, 2 डिसेंबर रोजी राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांसाठी आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना निलंबित (Suspended) केले होते. त्यांच्यासह इतर आरोपी पोलीस अधिकारी पराग मणेरे (DCP Parag Manere) यांनाही निलंबित केले आहे. सिंह यांच्या काळात पराग मणेरे हे ठाणे (Thane) आणि मुंबईचे (Mumbai) पोलीस उपायुक्त (DCP) होते.

 

Web Title :- DGP Sanjay Pandey | maharashtra dgp sanjay pandey denies former mumbi cp parambir singh allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ