Dhananjay Mahadik | नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिकांनी राजू शेट्टींचे चक्क रस्त्यातच पाय धरले!

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Mahadik | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Clections 2022) विजयी झालेले भाजपाचे (BJP) नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक आज मुंबईहून कोल्हापुरात (Kolhapur) परतत असताना आज अचानक रस्त्यावरच त्यांची भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याशी झाली. यावेळी महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी रस्त्यातच शेट्टी यांना चरणस्पर्श केला आणि आशीर्वाद घेतले.

 

दोघांनीही आपल्या सोशल मीडियावरून या भेटीची माहिती फोटोसह दिली आहे. राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की, पुण्याहून कोल्हापूरला येत असताना कराड येथे धनंजय महाडिक यांची भेट झाली. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

 

तर धनंजय महाडिक यांनीही ट्विट करून राजू शेट्टी यांचे आभार मानले आहेत. महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी कराड येथे स्वागतपर सत्कार केला. विजयश्री संपादन केल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी केलेल्या प्रेमपूर्ण सत्काराबद्दल त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार.

मुंबईत काल भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपच्या तीनही नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ झाला.
त्यानंतर महाडिक कोल्हापूरकडे परतले. दरम्यान, ते पुण्यात देखील थांबले होते.
यावेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap), तसेच मुक्ता टिळक (Mukta Tilak,)
यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले.
आज दुपारी महाडिक कोल्हापुरात पोहचल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

Web Title :- Dhananjay Mahadik | former mp raju shetti meet and congratulate newly elected mp dhananjay mahadik after won rajyasabha election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा