Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे छत्रपती यांच्या ट्विटचा अर्थ काय? पराभवानंतर शिवसेनेवर ‘निशाणा’ ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून सध्या राज्यात राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच टिका-टिप्पणी सुरू आहे. राज्यसभेसाठी शिवसेना मदत करेल, अशी अपेक्षा असताना शिवसेनेने घातलेल्या शिवबंधन बांधण्याच्या अटीमुळे आयत्यावेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून माघार घेतली होती. यानंतर याच जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती, पवार यांचा विजय पक्का असतानाच देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या यशस्वी राजकीय खेळीमुळे सेनेचा पराभव झाला. यावरूनच संभाजी राजेंनी एक ट्विट केले आहे, त्या ट्विटची सध्या चर्चा सुरू आहे.

 

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ॥

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥

 

 

संभाजीराजेंनी तुकोबांच्या अभंगातील ओवी ट्विट केली आहे, या ओवीचा अर्थ आहे, वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणार्‍याची लगेचच फजिती होते. (Sambhajiraje Chhatrapati)

 

दरम्यान, शिवसेनेने राज्यसभेसाठी उमेदवारी नाकरल्यानंतर सुद्धा संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. आता पुन्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेला जिव्हारी लागणारी टिका ट्विटच्या माध्यमातून केल्याने खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दिलेला 6 वा उमेदवार पराभूत झाल्यानंतर संभाजीराजेंनी वरील ट्विट केले होते. मात्र, शिवसेनेवर ही टिका करताना त्यांनी कुठेही शिवसेनेचा उल्लेख केलेला नाही.

 

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याच पराभवावरून अपक्ष आमदारांवर टिका केली आहे. कारण फडणवीस यांनी अपक्ष आणि लहान पक्षांतील आमदारांना जवळ केल्याने 6 व्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | What is the meaning of Sambhaji Raje Chhatrapati’s tweet? ‘Target’ on Shiv Sena after defeat! Said …

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा