संपली का दरवाढ कमी करण्याची नवलाई ? : धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

संपली का दरवाढ कमी करण्याची नवलाई ? पुन्हा ये रे माझ्या मागल्या, फिरसे दाम बढा दिये भाई. असे ट्विट करत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे सरकारवर टीका केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5ee0e54-c96d-11e8-855c-7d7b80d051f2′]

यावेळी इंधन किंमतीत केंद्र व राज्य सरकारनी मिळून पाच रुपयांची कपात केल्यानंतर पुन्हा पेट्रोल 18 पैसे तर, डिझेल 69 पैशांनी वाढले आहे. याप्रकरणी पुन्हा येरे माझ्या मागल्या, संपली का दरवाढ कमी करण्याची नवलाई ?  असा सवाल धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरद्वारे केला आहे.

[amazon_link asins=’B079NBHCKM,B07DC5QRHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’178a1212-c96e-11e8-bf37-edf3eb147bf7′]

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करणे केंद्र सरकारच्या हातात नाही असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारने, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अडीच रुपयांची कपात केली होती. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही अडीच रुपयांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाच रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इंधन किंमतीत पाच रुपयाने घट केल्यानंतर आज पुन्हा  पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आता 91 रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यातच भर म्हणून घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीतही दरवाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुण्यात पेट्रोलचा भाव 91.40 पैसे तर डिझेलचा भाव 78.83 पैसे झाला होता.

यंदाची दसरा दिवाळी सर्वसामान्य नागरिकांसाठी दुहेरी संकट घेऊन येणार असल्याचे दिसत आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ तर दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्येही दरवाढ झाल्यामुळे यंदा दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये तब्बल ५९ रुपयांची वाढ तर, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2.89 रुपयांची वाढ झाली.