Dhananjay Munde | ‘राज ठाकरे बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमातील अर्धवटराव’; धनंजय मुंडेंची जहरी टीका

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यासोबतच ठाण्यामधील (Thane) सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना लक्ष्य केलं होतं. याचाच धागा पकडत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ (Ardhavatrao) असं टीका करताना म्हटलं आहे.

 

भाजपच्या (BJP) सीडी (CD) लावणाऱ्या राज ठाकरेंमध्ये तीच सीडी घुसली आहे.
ईडीचा (ED) परिणाम असा झाला की लाव रे ती सीडी म्हणणारे, आता कुठं आहे रे सीडी, असं म्हणत टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) उपस्थित होते.

भाजपचे भोंगे म्हणून जे काम करत आहेत.
आम्ही दवाखान्यात होतो म्हणून कळलं नाही मात्र आम्ही टीव्हीवर पाहिल्यावर आम्हाला लक्षात आलं आम्ही शाळेत असताना रामदास पाध्ये यांच्या हातात बाहुला असायचा.
त्यांना जे बोलायचं नाही ते बाहुल्याच्या तोंडून रामदास पाध्येच (Ramdas Padhye) बोलायचे अशाच प्रकारे ‘रामदास पाध्ये’ च्या तोंडून एक अर्धवटराव बोलत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर श्रद्धेचा विषय आहे.
महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं.
त्यास भोसल्यांची राजवट नाव दिलं नाही.
अठरा पगड जातींनासोबत घेऊन स्वराज्य उभं केलं आणि त्याला रयतेचं स्वराज्य असं नाव दिलं आणि या रयतेच्या स्वराज्याला अभिप्रेत असणार राजकारण 20 व्या आणि 21 व्या शतकात कोणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

 

Web Title :- Dhananjay Munde | MNS Chief raj thackerays ardhavatrao NCP leader dhananjay mundes scathing remarks


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा