Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का?’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | बीड जिल्ह्यात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळते. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) व मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात वारंवार आरोपांच्या फैरी झडत आहे. येथील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे.

 

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. तो पराभव विसरलात का? असा एक टोला लगावला. ‘मी मंत्रीपदी होताे, तेव्हा पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. थेट 32 व्या क्रमांकापर्यंत माझे मंत्रीपद कधीच गेले नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला होता. यावरुन आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केला. 2019 मध्ये तुम्हाला औकात दाखवली ते विसरलात का? असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या विकासासाठी स्वतः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते सुरु केले, त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. तुम्ही परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा याद्वारे अपमान केला आहे, असे सांगत तुम्ही महिला व बालविकास मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या, महाराष्ट्राच्या नेत्या होतात, तेव्हा विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे. माझी 500 कोटी रुपये आणण्याची औकात आहे, नगदी हिशेब देऊ का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 

Web Title :- Dhananjay Munde | NCP leader and minister dhananjay munde replied bjp pankaja munde election campaign beed district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा