धवलसिंह मोहिते-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेतुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर धवलसिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यानंतर पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

माढा लोकसभा मतदार संघाबाबत राज्यभर चर्चा चालु आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लागलीच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धवलसिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार काय इथपर्यंत चर्चा सुरू झाली. अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून माढा लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यातच उध्दव ठाकरे यांना धवलसिंह यांची पक्षातुन हकालपट्टी केल्याने तर्क-वितर्क काढले जात आहेत. धवलसिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची उमेदवारी देणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळेल अशी देखील चर्चा आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेने धवलसिंह मोहिते-पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

You might also like