Dheeraj Patil Suspended | साताऱ्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे निलंबन; प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे Anti Corruption Bureau (ACB) असलेली तक्रार, अशा गंभीर आरोपांमुळे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक आणि तत्कालीन साताऱ्याचे अपर पोलीस अधीक्षक (Former Addl SP Satara) धीरज शंकरराव पाटील यांच्यावर निलंबनाची (Dheeraj Patil Suspended) कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची बदली (Transfer) होमगार्ड विभागात (Home Guard) केली आहे. धीरज पाटील यांच्या निलंबनाचे (Dheeraj Patil Suspended) आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Maharashtra Government Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने काढले आहेत.

 

धीरज पाटील (Dheeraj Patil Suspended) यांच्या विरोधात विद्युत विभागाच्याही (Electrical Department) अनेक तक्रारी आहेत. महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी, मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यापान करुन गैरवर्तन करणे. स्वत:च्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे, अशा तक्रारी विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणात लोकायुक्त (Lokayukta) यांच्याकडेही तक्रार दाखल असल्याने राज्य सरकारने (State Government) त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

 

निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांची बदली मुंबई होमगार्डच्या मुख्यालयात (Home Guard Headquarters Mumbai) करण्यात आली आहे. होमगार्डचे महासमादेशक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महासमादेशक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल व त्या कारणासाठी वेगळी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Dheeraj Patil Suspended | Former additional superintendent of police satara dheeraj patil has been suspended

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! दोन वर्षानंतर राज्यात आज शून्य ‘कोरोना’ मृत्यूची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Lilly Summers | ऐकावं ते नवलच ! ‘पुतिन यांचे आदेश न ऐकणाऱ्या सैनिकांना मी…’; अ‍ॅडल्ट मॉडलने रशियाच्या सैनिकांना दिली विचित्र ऑफर

 

Pune Corporation | 100 नगरसेवक निवडूण आल्यानंतरही स्वीकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपदी संधी ! गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजप संविधानाची पायमल्ली करत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट (Video)