कधी मैदानावर परतणार धोनी ? IPL-2020 संदर्भातील सर्वात मोठं अपडेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनी लवकरच मैदानात दिसेल. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या 13 व्या हंगामात तो टीमच्या सरावात सहभागी होईल. इतर खेळांडूंसह धोनी चेन्नईमध्ये 2 मार्चपासून सराव सुरु करेन.

मागील जून-जुलैमध्ये ICC वर्ल्ड कपनंतर 38 वर्षीय धोनीच्या खेळाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता हे स्पष्ट आहे की तो येणाऱ्या आयपीएलसाठी एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये तो सराव करताना दिसेल.

आयपीएल 2020 च्या सुरुवातीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मागील वर्षाचा विजेता संघ मुंबई इंडियन्समध्ये 29 मार्चमध्ये मुंबईत होईल. सीएसकेचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले की धोनी अन्य खेळांडूंसह सराव करेल, असे असले तरी संघाचे पूर्ण तयारीचे शिबिर 19 मार्चपासून सुरु होईल.

सूत्रानुसार धोनी सुरेश रैना आणि अंबाती रायडूसोबत दोन आठवडे सराव करेल. यानंतर ब्रेक घेऊन परत सरावाला सुरुवात करेल. रैना आणि रायडू चेन्नईमध्ये मागील 3 आठवड्यापासून सराव करत आहेत.

धोनीला वर्षाच्या सुरुवातीला (16 जानेवारी) बीसीसीआयने आपल्या कराराच्या यादीतून बाहेर केले होते. परंतु धोनीच्या कारकिर्दीबद्दल व्यक्त करण्यात येणाऱ्या शंका-कुशंका धोनीने झारखंडमध्ये आपल्या रांचीच्या संघाबरोबर सराव केल्याने मागे पडल्या. यात त्याने आयपीएलसाठी स्वत:ला तयार करत असल्याचे संकेत दिले.

तीन वेळा आयपीएल चॅम्पियनशीपचा अनुभव असलेले पीयूष चावला, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड, इंग्लंटचा ऑलराऊंडर सॅम कुरेन आणि तमिळनाडूचा स्पीनर आर. साई किशोर यांना मागील डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात निवडण्यात आले होते.