ध्रुव सरजानं ‘ज्युनिअर चिरंजीवी’साठी बनवला खास ‘चंदेरी’ पाळणा, किंमत जाणून व्हाल हैराण

चेन्नई : वृत्तसंस्था – साऊथ सुपरस्टार चिरंजीवी सरजा (chiranjeevi sarja) याचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या केवळ 39 वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्यानं त्याची पत्नी मेघनाला मोठा धक्का बसला. चिरंजवीने जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्याची पत्नी मेघना राज (meghna raj) प्रेग्नंट होती . मेघना लवकरच चिरंजीवीच्या बाळाला जन्म देणार आहे. चिरंजीवीच्या प्रेमाची (Love) निशाणी असलेल्या या बाळाच्या स्वागतासाठी अख्खे सरजा कुटुंबीय आतुर आहे. अशातच चिरंजीवीचा भाऊ व कन्नड अभिनेता ध्रुव सरजा (dhruva sarja) याने या बाळासाठी खास चांदीचा पाळणा (silver crib) बनवला आहे.

सध्या या पाळण्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत ध्रुव चांदीच्या पाळण्यासोबत पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या पाळण्याची किंमत 10 लाख रुपये सांगितली जात आहे. दिवंगत भावाच्या बाळासाठी ध्रुवने बनवलेला हा चंदेरी पाळणा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

चिरंजीवी आणि मेघना यांचे 2 मे 2018 रोजी लग्न झाले होते. हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. 7 जून 2020 रोजी चिरंजीवी सरजावर काळाने झडप घातली. त्यावेळी मेघना चार महिन्यांची गर्भवती होती. या कठिण काळात ध्रुव शिवाय अख्खे सरजा कुटुंबीय खंबीरपणे मेघानाच्या पाठीशी उभे राहिले आहे. चिरंजीवी सरजाने 2009 मध्ये वायूपुत्र या चित्रपटाच्या माध्यमातून आपली कारकिर्द सुरु केली होती. त्याने 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यातील अनेक चित्रपट गाजले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. चिरु मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण तुझ्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तुझे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे तू मला कधीही सोडून जाऊ शकत नाहीस. आपलं मूल हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे. ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे. मी आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट बघते. तुझा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी फार काळ वाट पाहू शकत नाही, असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.

You might also like