धुळे : बंदुकीच्या धाकाने 5-6 जणांनी ट्रक चालकाला लुटलं, एकूण 7 लाखाचा ऐवज चोरला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय महामार्ग (क्र.3) वरील नगाव गावाजवळील स्पिडब्रेकरवर ट्रक चालकाला 5-6 जणांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. लुटारुंनी रोख रकमेसह 15 म्हशी, मोबाईल, असा एकूण 6 लाख 71 हजार रुपयांचा माल लुटला. याप्रकरणी तालुका पोलीसांत ट्रक चालकाने तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, काल बुधवार (दि.08) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग (क्र.3) वरून ट्रक चालक  सलमान खान व शरफत खान आयशर ट्रक मध्ये 15 म्हशी घेऊन मध्यप्रदेश कडे जात होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळ स्पिड ब्रेकरवर ट्रक आला असता लुटारूंनी स्विफ्ट डिझायर कार (क्र.एम 04 / डि डब्लु 6164) ही ट्रक समोर आडवी लावली. त्यातील पाच – सहा जणांनी तोंडाला मास्क बांधून धमकी देत ट्रक (क्र.एम एच 18/ बी जी 2212) ताब्यात घेतला. बंदुकीचा धाक दाखवत ट्रक चालकाला त्यांच्या स्विफ्ट मध्ये बसवले. त्यांना चाळीसगाव मार्गाने औरंगाबाद दिशेने घेवून जात त्यांच्या खिशातील रोख रक्कम 29 हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. आयशर ट्रक मधील 15 म्हशीची परस्पर विल्हेवाट लावली. असा एकूण 6 लाख 71 हजार रुपयांचा माल लुटून नेला. ट्रक चालकाला व त्याच्या साथिदाराला नवलनगर जवळील रस्त्यावर सोडून देत चोरटे कार मधुन पसार झाले.

ट्रक चालकाने तालुका पोलीस ठाणे गाठत आरोपी व वाहना बाबत पोलीसांना माहिती दिली आहे. त्या आधारे गुन्हा नोंद करुन तालुका पोलीस पुढील तपास करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like