धुळे : शहरात दोन ठिकाणी घरफोडी ; दीड लांखांचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनेत दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शहरातील ऐशी फुटी रोड आणि जयहिंद कॉलनी येथे घडली. ऐंशी फुटी रोडवरील मोबाईल दुकान आणि जयहिंद कॉलनीतील शुजच्या दुकानात घरफोडी करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, ऐंशी फुटी रस्यावरील हिदायत शॉपिंग सेंटर मधील वसीम टी शाह यांचे मालकीचे मोबाईल दुकान आहे. काल मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील रिपेअरिंगसाठी आलेले सहा ते सात मोबाईल, दहा ते पंधरा नविन मोबाईल आणि गल्ल्यातील रोख रक्कम अंदाजे बारा ते पंधरा हजार असा एकुण अंदाजे सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

चोरट्यांनी सिसीटिव्हीच्या वायर कापून टाकल्या व कँमेऱ्यांच्या दिशा बदलून दुकानात चोरी केली. सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस अधिकारी यांनी पहाणी केली. फिंगर प्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकाची तपास कामी मदत घेण्यात आली.तसेच देवपुरातील जयहिंद चौकातील शुज दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांने गल्यातील रोख पाच हजार रुपये व नविन बूट, चप्पल चोरुन नेले. या प्रकरणी देवपुर पोलीसांत दुपारी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त – 

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या

नकळत होणाऱ्या ‘ह्या’ वेदनांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते ‘जीवावर’

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम