Dhule Crime | धक्कादायक ! पती आणि मुले बाहेर असताना पत्नीचा धारदार शस्त्राने खून, प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – घरात पती आणि मुले नसताना 32 वर्षीय विवाहित महिला शीतल भिकन पाटील यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना (Dhule Crime) घडली आहे. धुळे शहरातील जगन्नाथनगर येथे राहत्या घरात हा थरार घडला. यामुळे परिसरात एकच खळबळ (Dhule Crime) उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला संशयीत
महिलेचा पती घरात नसताना संशयिताने महिलेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मित्राने हे कृत्य केल असावे; असा संशय महिलेच्या पतीने व्यक्त केला आहे. घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशय व्यक्त करण्यात आलेला इसम घरी येऊन गेल्याचे दिसत आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पश्चिम देवपूर पोलीस तपास करत आहेत. महिलेचा खून कोणी व का केला? हे अजून उघड झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title :-  dhule crime | house wife women muder when husband and son out side of home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’