कोरोनाच्या सावटाखाली धुळ्यात धुळवड साजरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात धुलीवंदनाच्या निमित्ताने कोरोना व्हायरस भीतीपोटी यंदा उत्साह कमी दिसून आला. पारंपारिक गुलाल पुष्पवृष्टी करून धुलीवंदन नागरिकांनी साध्या पध्दतीने साजरा केला. कोरोना व्हायरस प्रभाव पाहायला मिळाला. रंगांची उधळण कोणी केली नाही व गर्दीत सहभागी होणे लोकांनी टाळले. व्हायरसच्या भितीमूळे नागरिकांनी गर्दीत सहभाग घेतला नाही. चायना वस्तू, ऑईली रंग, पिचकाऱ्या, चायना कंपनीच्या वस्तू खरेदी करण्यापासून नागरिकांनी दूरच राहण्याचा प्रयत्न केला.

शहरातील गिंडोडिया कंपाउंड, खंडेराव बाजार, पाचकंदील चौक, मिरच्या मारुती खुंट, गांधी पुतळा, जुने धुळे, दत्त मंदिर कुमार नगर, पारोळा बाजार, समिती आवर, वाखरकर नगर बाजारात मोठ्या धामधुमीत विविध रंगांची उधळण करत रंगबिरंगी एकमेकांना लावत धुलीवंदन साजरा करण्यात येतो. परंतु यंदा हा उत्साह अल्प प्रमाणात दिसून आला.

कोरोना व्हायरस भीतीमुळे शहरातील चौकाचौकात डि.जे. च्या तालावर नाचत तरूण दंग होतात, यंदा ते प्रमाण कमी होते. साध्या पद्धतीने नागरिकांनी धुळवड साजरी केली. धुलीवंदन निमित्त तृतियपंथीनी बर्फ कारखाना जवळील परिसरात पारंपरिक रंगांची उधळण व पाण्याचा मारा करत धुळवडीचा आनंद लुटला.

सालाबादाप्रमाणे धुलीवंदन चौकाचौकात ज्याप्रमाणे रंगांचा व पाण्याचा मारा करण्यासाठी एकमेकांमध्ये जी चढाओढ दिसून येते. ती यंदा दिसून आली नाही. तरुण-तरुणी, महिला, पूरुष, लहान मुले धुळवड आनंद लुटतात तो उत्साह यंदा पाहिला मिळाला नाही.