धुळे : श्रीरंग कॉलनीत घरफोडी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच साक्री रोड गोपाळ नगरातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला होता. त्यापाठोपाठ आता देवपूरातील सेवानिवृत्त कर्मचारीचे घरातून हजारो रुपयांचा माल चोरट्याने लंपास केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, देवपूरातील प्लॉट नं.84 दत्तमंदिर श्रारंग कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी प्रविण पिंताबर महाले काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. याच दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरट्याने घराच्या दाराचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करत घरातील 7 हजार रुपयांचा महागडा मोबाईल व पाच हजार रुपये रोख रक्कम असा माल चोरट्याने लंपास केला.

घरी परतल्यावर चोरी झाल्याचे महाले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घटनेबाबत देवपूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी चव्हाण करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like