धुळे-नंदूरबार विधानपरिषद पोटनिवडणूक ‘जाहीर’, ‘या’ दिवशी होणार ‘मतदान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे-नंदूरबार स्थानिक संस्था ही विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. अमरिशभाई रसिकलाल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी याच महिन्यात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

धुळे-नंदूरबार स्थानिक संस्था या विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 30 मार्चला मतदान होणार आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये अमरिशभाई पटेल यांनी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अमरिशभाई पटेल यांचे बंधू उपनगराध्यक्ष भूपेश पटेल हेदेखील यावेळी उपस्थित होते.