20 वर्षापुर्वीच्या दरोडयाच्या गुन्हयातील सोनं पोलिसांकडून फिर्यादीला परत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत 1999 मध्ये दरोडाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यातील आरोपी कडुन 34.50 ग्रँम सोन्यांची लगड व 750 ग्रँमची लगड हस्तगत करण्यात आली होती. तो माल आझाद नगर ठाण्यात जमा होता. न्यायालयीन खटला व कामकाज पुर्ण झाल्या नंतर आज तब्बल वीस वर्षानी आझाद नगर पोलीसांनी हि हस्तगत केलेली सोन्यांची लगड व चांदीची लगड न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी नारायण मदनलाल अग्रवाल रा. अग्रवाल नगर यांना आझाद नगर पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना सुपूर्द केली. यावेळी आझाद नगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पो.ना.दगडु कोळी, पो.का.चेतन सोनवणे यांचे नारायण अग्रवालानी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like