धुळे : गरताड बारी जवळील रस्त्यावर कारच्या धडकेत महिला जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर-सुरत महामार्गावरील चाळीसगाव रोड गरताड बारी सिंमेट गोडावून जवळ भिषण अपघात झाला. चाळीसगावहून नवरा बायको दोघे मोटरसायकलने धुळ्याकडे येत असताना गरताड बारी जवळील सिंमेट गोडावून समोरील रस्त्यावरील खड्डा वाचविण्याचा प्रयत्नात मोटर सायकल खड्यात गेली. त्यातील धक्यानेच महिला दुचाकीवरुन रस्त्यावर खाली पडली. याच दरम्यान पाठिमागून धुळ्याकडे येणारी चारचाकी गाडी कार भरधाव वेगाने येत होती. तिची जोरदार धडक महिलेला बसली व महिलेच्या अंगावरुन हि चारचाकी गाडी भरधाव वेगाने महिलेला चिरडुन निघुन गेली. त्यातच महिला जागीच ठार झाली.

काही नागरीकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला जिल्हा रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी तपासणी करुन महिलेला मृत घोषित केले. पोलीसांनी महिलेचा मृतदेह नागरीक व नातेवाईकांच्या मदतीने पोस्टमाॅर्टसाठी शवविच्छेदन गृहात पाठविला. महामार्गावर झालेल्या या अपघाता मुळे वाहतूक ठप्प झाली होती.

रस्त्यावर असलेल्या काही नागरीकांनी हा अपघात प्रत्यक्षपणे पाहिला आहे अशी चर्चा नागरीक रुग्णालयात करत होते. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. फरार झालेल्या चारचाकी वाहन व चालकांची माहितीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न तालुका पोलीस करत आहे.

मयत महिलेचे ओळख पटली असुन तिचे नाव कल्पनाबाई संजय जगताप (वय-36, रा. वाखारकर नगर, धुळे) असे आहे. तिचे पश्चात पती, दोन लहान मुली असा परिवार आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. वाखारकर नगरात अपघाताची माहिती कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाता बाबत उशीरा पर्यत तालुका पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/