Diabetes | डायबिटीजमध्ये अतिशय लाभदायक ‘रुईची पाने’, अशाप्रकारे करा वापर, ज्यामुळे ब्लड शुगर राहते कंट्रोल

नवी दिल्ली : डायबिटीज (Diabetes) आजकाल एक सामान्य आजार झाला आहे. सर्व वयोगटातील लोकांना याचा फटका बसत आहे. डायबिटीज रुग्ण ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी विविध गोष्टींचे सेवन करतात. परंतु, रुईची पाने डायबिटीजच्या (Diabetes) रुग्णांसाठी खुप लाभदायक आहेत.

रुई वनस्पती विषारी असूनही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Antioxidant and Anti-Inflammatory) गुणधर्म असतात, जे शरीराला निरोगी ठेवतात. आयुर्वेदात रुईच्या पानांचा वापर अनेक आजारांत केला जातो. एका रिसर्चनुसार, डायबिटीजच्या रुग्णांसाठी सुद्धा रुईची पाने लाभदायक आहेत. परंतु रुईची पाने वापरताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. –

डायबिटीजमध्ये रुईच्या पानांचे फायदे – Rui Leaves for Diabetes Patients

  • रुईची पाने अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात.
  • आयुर्वेदात डायबिटीजवर उपचार करण्यासाठी स्वर्णभस्मामध्ये रुईच्या पानांचा वापर केला जातो.
  • एनसीबीआयमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, रुईची पाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवतात.
  • रुईची पाने इन्सुलिन सेन्सेटिव्हीटी सुधारतात.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने रुईच्या पानांचा वापर केल्यास डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो.

डायबिटीजमध्ये रुईची पाने कशी वापरावी?

  • डायबिटीजचे रुग्ण रुईची पाने वापरू शकता.
  • यासाठी रुईची पाने घ्या. त्यांना बारीक करून पेस्ट बनवा.
  • आता ती पेस्ट पायाच्या तळव्यावर लावा.
  • नंतर मोजे घालून झोपा.
  • यामुळे ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.
  • रुईची पाने तोडताना थोडी काळजी घ्या. कारण त्यातून बाहेर पडणारे दूध डोळ्यांना हानी पोहोचवू शकते.
  • रुईच्या पानांचे थेट सेवन टाळा. त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. अन्यथा नुकसान होऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती