सायलेंट किलर आहे ‘हा’ आजार, डोळ्यांपासून किडनीपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव करतो ‘खराब’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुमच्या शरीरात सुद्धा डायबिटीजची लक्षणे दिसू लागली तर सावध व्हा. हा आजार हळुहळु पण शरीराच्या प्रमुख अवयवांना नुकसान पोहचवतो. हाय ब्लड शुगरमुळे रूग्णांना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. तोंड कोरडे पडणे, थकवा, पाय सून्न पडणे आणि त्वचेशी संबंधी आजार या आजाराची वॉर्निंग साईन आहे. हा आजार तुमच्या ब्लडस्ट्रीमसह शरीराच्या प्रमुख अवयवांना सुद्धा खराब करतो.

डोळ्यांमध्ये अस्पष्टता –
एक्सपर्ट सांगतात की, डायबिटीजमुळे एखाद्या व्यक्तीचे डोळे खराब होऊ शकतात. यामध्ये व्यक्तीला अस्पष्ट दिसणे सुरू होते. या आजारात रेटीना रक्तपेशींना डॅमेज करण्याचे काम करते. याच्या लास्ट स्टेजमध्ये अनेकदा व्यक्ती पूर्णपणे आंधळा होऊ शकतो.

किडनी फेल्यूअर –
डायबिटीजच्या रूग्णांमध्ये किडनीशी संबंधीत समस्या खुप सामान्य आहेत. एकदा किडनीने काम करणे बंद केले तर तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिसची आवश्यकता पडते. एक्सपर्ट म्हणतात की, हाय ब्लड शुगरमुळे व्यक्तीची किडनी सुद्धा फेल होऊ शकते.

स्किन डॅमेज –
रक्तपेशी डॅमेज झाल्याने डायबिटीज रूग्णांना त्वचेशी संबंधीत समस्या सुद्धा होऊ लागतात. यामुळे स्किन पिग्मेंटेशन होते. तसेच स्किनवर गडद डाग, विशेषता हात आणि पायाच्या समस्या वाढतात. यामध्ये वेदना आणि खाज नसेल तरी हळुहळु स्किन डॅमेज होऊ लागते.

पायांमध्ये बधीरता –
डायबिटीजमध्ये नर्व्हस डॅमेज झाल्याने पायांमध्ये बधीरता किंवा वेदना जाणवते. डायबिटीजमुळे रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळे येऊ लागतात. तुम्हाला सुद्धा पायांमध्ये सुन्नपणा जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हृदयरोग –
डायबिटीजशी संबंधीत समस्या झाल्यास हार्ट डिसीज (हृदयरोग) होण्याची शक्यता खुप वाढते. हायब्लड शुगर तुमच्या कार्डियोव्हस्क्यूलर हेल्थवर वाईट परिणाम करते. यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयशी संबंधीत आजारांचा धोका वाढतो.

जखम न भरणे –
डायबिटीजच्या रूग्णाची जखम सहजपणे भरत नाही. रक्तपेशीतील खराब फ्लोमुळे अशी समस्या होते. अनेकदा तर मच्छर चावल्यानंतर खाजवल्यानंतर सुद्धा स्कीनवर जे डाग येतात ते मोठ्या जखमेत बदलू शकतात.

डायबिटीजचा उपचार –
डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे की, तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे. याशिवाय असे घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे डायबिटीज नियंत्रित करून एक सामान्य जीवन जगू शकता. प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूडचे सेवन टाळावे. केवळ हेल्दी कार्ब्सचे सेवन करावे. फायबरवाल्या वस्तू सेवन कराव्यात.