Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी सर्वात मोठे आव्हान असते Blood Sugar नियंत्रणात ठेवणे. अनियंत्रित ब्लड शुगर रूग्णांमध्ये अनेक दुसर्‍या आरोग्य समस्यांचा धोका वाढवते. रूग्ण डायबिटीज नियंत्रित (Diabetes Control) करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तज्ज्ञ सांगतात की, भारतीय स्वयंपाक घरात वापरल्या जाणार्‍या काही मसाल्यांमध्ये भरपूर औषधीय गुण आढळतात. यापैकी चार मसाले आपल्या आहारात सहभागी केले तर ब्लड शुगर सहजपणे नियंत्रणात ठेवता येते.

1. हळद

आरोग्य तज्ज्ञांनुसार हळदीतील करक्यूमिन अँटी-ऑक्सीडेंट्स आणि अँटी-इम्फ्लेमेट्री गुण डायबिटीजच्या उपचारात मदत करतात.

2. मेथी

मेथी मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुप लाभदायक आहे. मेथी पचनशक्ती वाढवते आणि ती कार्ब्ज अब्जॉर्ब करण्याची क्षमता कमी करत असल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

3. तुळस

तुळशीमुळे इम्युनिटी सुधारते, शरीर मजबूत होते, ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. स्ट्रेस कमी होतो. मानसिक आरोग्य सुधारते.

4. दालचीनी

संशोधनानुसार दालचीनीच्या सेवनाने डायबिटीज टाईप 2 ने ग्रस्त होण्याचा धोका कमी होतो. दालचीनीमध्ये मिथाईल हायड्रॉक्सी चालकोन पॉलीमर असते, जे ग्लुकोजच्या अपटेकला नियंत्रित करते.

हे देखील वाचा

Vegetarian Protein | ‘या’ 10 शाकाहरी गोष्टींत असतं चिकन लेग पीस इतकं ‘प्रोटीन’, आहारात करा समावेश; जाणून घ्या

Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Diabetes Control | Diabetes 4 herbs and spices control blood sugar levels

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update