Diabetes Control Diet | ब्लडमध्ये शुगरची लेव्हल कंट्रोल ठेवते काकडी, जाणून घ्या कसा करू शकता वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control Diet | शुगर (Sugar) हा खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे उद्भवणारा आजार आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात वाढत आहे. भारतात मधुमेही रुग्णांची संख्या 5 कोटीपर्यंत पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) म्हणण्यानुसार 2030 पर्यंत भारतातील मधुमेही रुग्णांची (Diabetic Patients) संख्या 8 कोटीच्या पुढे जाईल. हा जुनाट आजार आटोक्यात ठेवला नाही तर तो अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो (Diabetes Control Diet).

 

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) नियंत्रित राहते. शुगरच्या रुग्णांनी आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Low Glycemic Index) असलेले अन्न सेवन करावे, यामुळे साखर नियंत्रणात राहते.

 

हाय ग्लायसेमिक इंडेक्स (High Glycemic Index) असलेले अन्न पटकन पचले आणि शोषले जाते, ज्यामुळे ब्लड शुगर (Blood Sugar) मध्ये झपाट्याने वाढ होते. परंतु पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जितका कमी असेल तितका त्यांचा ब्लड शुगरवर परिणाम होतो.

 

काकडी (Cucumber) हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे, याच्या सेवनाने साखर नियंत्रणात राहते. फायबर (Fiber) युक्त काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 असतो, त्यामुळे याचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांना फायदा (Diabetes Control Diet) होतो.

मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे (How To Control Diabetes) :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी खूप फायदेशीर आहे. काकडीच्या बियांमध्ये कॅरोटीनॉइड्स (Carotenoid) आणि फ्लेव्होनॉइड्स (Flavonoid) दोन्ही असतात. कॅरोटीनोइड्स इम्युनिटी (Immunity) मजबूत करते आणि शरीर निरोगी ठेवते. तर फ्लेव्होनॉइड्स मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकार, स्ट्रोकचा (Stroke) धोका कमी करते.

 

जेवणाची चव वाढवणारी काकडी मधुमेही रुग्णाच्या रक्तातील ग्लुकोज (Glucose) शोषून घेण्यासोबतच साखरेचे पचन मंदावण्यास मदत करते.
त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी आपल्या आहारात काकडीचा समावेश जरूर करावा.

 

काकडीचे सेवन कसे करावे (How To Eat Cucumber) :

काकडी सालीसह खा, शरीराला दुहेरी फायदा होईल.

Cucumber, भरपूर फायबर, रक्तातील साखरेची पातळी सुधारते.

काकडी हा असाच एक पदार्थ आहे जो न शिजवता खावा.

ब्राउन ब्रेडसोबत सँडविचमध्ये काकडीचे सेवन करू शकता.

दह्याचा रायता बनवूनही तुम्ही काकडीचे सेवन करू शकता.

मधुमेही रुग्णही काकडीचे सूप बनवून वापरू शकतात, यामुळे साखर नियंत्रणात राहते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control Diet | Low glycemic index food cucumber can control blood sugar know how to use it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Magic Drink | वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ मॅजिक ड्रिंक आणि मिळवा अनेक आरोग्य लाभ, जाणून घ्या ‘ते’ कसे बनवतात?

 

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ आदेश

 

World Obesity Day | वजन कमी करायचे आहे तर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा