Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control | मधुमेह (Diabetes) हा एक मेटाबॉलिक डिसीज आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) झपाट्याने वाढते. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे हा आजार लहान वयातच लोकांना होत आहे. इन्सुलिनचे उत्पादन शरीरासाठी खूप महत्वाचे आहे (Diabetes Control).

 

इन्सुलिन रक्तातून ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जेव्हा शरीरात इन्सुलिन (Insulin) योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम रूग्णाच्या शरीरावरही होतो.

 

जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिन तयार करणे थांबवते तेव्हा ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes Patients) शुगरवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

 

अनेकदा लोक शुगर नियंत्रणात (Sugar Control) ठेवण्यासाठी औषधे घेतात. परंतु काही प्रभावी औषधी वनस्पतींचे सेवन करून देखील मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

 

तोंडलीच्या पाने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत (Ivy Gourd Leaves Can Control Blood Sugar). तोंडलीसोबतच त्याची पानेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. औषधी गुणांनी युक्त असलेली तोंडलीची पाने शुगर कशी नियंत्रित ठेवतात ते जाणून घेऊया (Know How To Consume Ivy Gourd Leaves).

तोंडलीचे फायदे (Benefits Of Ivy Gourd) :
मधुमेह, दमा, बद्धकोष्ठता आणि हाय कोलेस्टेरॉल यांसारख्या अनेक आजारांवर तोंडलीच्या भाजीचे सेवन करून उपचार करता येतात. 2003 मध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की तोंडली ही मधुमेहावरील उपचारात उपयुक्त आणि प्रभावी भाजी आहे (Diabetes Control).

 

तोंडलीची पाने कसे करतात मधुमेहावर नियंत्रण (How Ivy Gourd Leaves Control Diabetes) :
तोंडली एक भाजी आहे जी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. तोंडलीसोबतच त्याच्या पानांचे सेवनही शरीरासाठी गुणकारी ठरते.

 

पौष्टिकतेने समृद्ध तोंडलीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल (Vitamins, Minerals, Calcium, Fiber, Antioxidants, Anti-Inflammatory, Anti-Bacterial) असे गुणधर्म असतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तोंडलीच्या पानांचे सेवन करावे.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी कसे करावे तोंडलीच्या पानांचे सेवन (How To Consume Ivy Gourd Leaves To Control Diabetes) :

1. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तोंडलीची पाने चांगली धुवून वाळवावीत.

2. पाने चांगली सुकल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून बारीक पावडर बनवा.

3. आता ही पावडर रोज 1 ग्रॅम घ्या.

4. तोंडलीच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून किंवा दुधात मिसळून सेवन करू शकता.

5. तोंडलीच्या पानांमुळे ब्लड शुगर वेगाने नियंत्रित राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या