Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुशखबर ! बायोकॉनच्या नव्या औषधाला मंजूरी; जाणून घ्या कसा फायदा मिळणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांना ब्लड शुगर कमी करण्यासाठी आता केवळ इन्सुलिनवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने बायोकॉन-वायट्रिसचे सेमग्ली (Semglee) या औषधाला (Diabetes New Medicine) मंजूरी दिली आहे. हे पहिले असे इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रॉडक्ट आहे ज्याचा वापर डायबिटीजच्या (Diabetes cure) उपचारात इन्सुलिन प्रमाणे होतो.

USFDA द्वारे सेमग्ली (इन्सुलिन ग्लार्जीन) ला मंजूरी देण्याचा अर्थ आहे की, यास आता सनोफीचे औषध लँटसच्या ऐवजी वापरले जाऊ शकते. रूग्ण आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय सुद्धा पर्याय म्हणून हे औषध मेडिकल स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

हे बायोसिमिलर औषध बायोकॉन बनवणार आहे तर अमेरिकेत सेमग्लीचे मार्केटिंग बायोकॉनची पार्टनर कंपनी वायट्रिस करणार आहे. USFDA चे कार्यकारी आयुक्त जेनेट वुडकॉक (Janet Woodcock) यांनी म्हटले की, हा त्या लोकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे जे डायबिटीजच्या उपचारासाठी रोज इन्सुलिनवर अवलंबून राहतात, कारण बायोसिमिलर आणि इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रॉडक्ट परवडणारे आहे.

वुडकॉक यांनी म्हटले, अगोदर इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रॉडक्टला मंजूरी यूएसएफडीएची दिर्घकालीन प्रतिबद्धता दर्शवते ज्याअंतर्गत बायोलॉजिकल औषधांना बाजारात आणले जाते. हे कमी खर्चात बनवलेले सुरक्षित, प्रभावी आणि चांगल्या क्वालिटीचे औषध आहे जे रूग्णांच्या मदतीसाठी प्रभावी ठरेल.

यामुळे मोठ्या कालावधीपर्यंत काम करणार्‍या इन्सुलिनने ग्लायसेमिक कंट्रोलमध्ये सुधारणा दिसू शकते.
जगभरात टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजचे कोट्यवधी रूग्ण आहेत.
कोरोनामुळे मागील 2 वर्षात डायबिटीजच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
अशावेळी नवीन औषध रूग्णांना दिलासा देण्याचे काम करेल.

Web Title :- diabetes cure usfda approves biocon insulin semglee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,431 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

IAS Transfer | राज्यातील 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रताप जाधव यांची ‘यशदा’च्या उप महासंचालक पदी नियुक्ती

Pune Police | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी सर्व काही स्पष्टच सांगितलं; IPS प्रियांका नारनवरे म्हणाल्या – ‘काही वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली….’ (ऑडिओ क्लिप)