Pune Police | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी सर्व काही स्पष्टच सांगितलं; IPS प्रियांका नारनवरे म्हणाल्या – ‘काही वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली….’ (ऑडिओ क्लिप)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेला (Sachin Waze) 100 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलीस (Pune Police) दलातील IPS महिला अधिकाऱ्याने (DCP) पुणे पोलीस (Pune Police) दलात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हप्ता वसुलीची ‘पोलखोल’ केली आहे. पुणे पोलीस परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे (Deputy Commissioner of Police Priyanka Narnavare) यांनी हप्ता वसुलीचे रॅकट (recovery racket) असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली होती. यासंदर्भात बोलताना म्हणाल्या, पोलीस आयुक्तालयातील (Police Commissionerate) काही कर्मचारीच आपल्याला त्रास देतात. झोन-1 च्या कार्यालयात वर्षानुवर्षे काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांची त्यांनी पोलखोल केली आहे. तर यापुर्वी झोन-1 मध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्तांबाबत देखील त्यांनी विधान केलं आहे. मी शिस्तप्रिय अधिकारी असून मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत. त्यांचे हप्ता वसुलीचे रॅकेट आहे, असा गौप्यस्फोट नारनवरे यांनी केला आहे.

मार्फ ऑडिओ क्लिप व्हायरल
नारनवरे यांनी सांगितले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ही मार्फ ऑडिओ क्लिप (Marf audio clip) आहे. यातील संदर्भ हा जुना आहे. माझ्या कार्यालयातील जे पोलीस अधिकारी, कर्मचारी 10-10 वर्षे झाले ते हप्ता वसुली करायचे. त्यांची बदली (Transfer) करण्यात आली. तरी देखील ते तेथून हप्ता वसूल करीत होते. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध दुखावले आहेत.

पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नवीन उद्योग सुरु करण्याचे काम काही कर्मचारी करीत होते. त्यांचे मोठे रॅकेट आहे. त्याच्याबाबत पोलीस आयुक्तांकडे (Police Commissioner) मी लेखी तक्रार दिली आहे. पोलीस आयुक्तांनी कारवाई (Action) करतो असे सांगितल्याचे नारनवरे यांनी म्हटले आहे.

 

अजूनही इथून ‘तिथे’ हप्ते जातात

मी उपायुक्त म्हणून परिमंडळ एक येथे येण्यापूर्वी यांचे सर्व गैरव्यवहार सुरु होते. त्यांचे रॅकेट सेट होते. अजूनही इथून काही लोकांना हप्ते जातात. काही दिवसांपूर्वी एका खंडणी प्रकरणात देखील त्यांचा संबंध होता. मी आल्यानंतर त्यांचे हे गैरप्रकार बंद केले. मी शिस्तप्रिय अधिकारी आहे. मी इथे आल्याने त्यांचे हितसबंध दुखावले गेल्याचे, नारनवरे यांनी सांगितले.

आधीच्या डिसीपींना मुख्यालयात जावे लागले
मी परिमंडळ एक मध्ये आल्याने आधीच्या डिसीपींना मुख्यालयात जावे लागले.
मी थेट आयपीएस असल्याने माझ्याबाबत अनेकांना हेवा वाटतो.
बदल्या होणार असल्याच्या निर्णयाच्या वेळी ही क्लिप बाहेर आणली आहे.
त्यांनी आपण वेळोवेळी जे बोललो त्यातमध्ये बदल करुन ही क्लिप तयार केली आहे.
ही क्लिप मार्फ असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Pune Police | DCP Priyanka Narnavare made everything clear about ‘that’ viral audio clip; IPS Priyanka Narnavare said – ‘Under the guidance of some seniors ….’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीचा नवा लुक सोशल मीडियावर Viral, कॅप्टन कूलची ही स्टाईल चाहत्यांना सुद्धा खुप आवडली

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ED प्रकरणात जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Chakan Crime | गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणात पोलिसांची 2 ठिकाणी मोठी कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त