Diabetes Symptoms | टाईप 2 डायबिटीजचा संकेत आहेत ‘हे’ असामान्य लक्षण, तुमच्यात तर दिसत नाही ना?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Symptoms | जगासोबतच भारतातही अनेकांना मधुमेहाची समस्या भेडसावत आहे. Indian Journal of Ophthalmology नुसार, 2045 पर्यंत, भारतातील सुमारे 35.7 मिलियन लोक मधुमेहाने ग्रस्त असतील. मधुमेहाच्या बाबतीत ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे. (Diabetes Symptoms)

 

सामान्यतः दृष्टी धूसर होणे, मोतीबिंदू, काचबिंदू, जखमा बर्‍या न होणे, वारंवार डोकेदुखी, इम्युनिटी कमकुवत होणे, हृदयाची धडधड ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात. परंतु शरीरात दिसणारी काही असामान्य लक्षणे देखील मधुमेहाचे लक्षणे असू शकतात. या असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, एखाद्याने त्वरित डॉक्टरांना भेटले पाहिजे.

 

मधुमेहाची असामान्य लक्षणे
मधुमेहामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level Control) नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे. याचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीजमध्ये, स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही आणि टाइप 2 डायबिटीजमध्ये, इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते.

 

अनेक वर्ष मधुमेहाची लक्षणे कोणालाच दिसत नाहीत आणि अस्वस्थ वाटत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मधुमेह असेल पण त्याची लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच प्रत्येक लहान लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खाली नमूद केलेली काही असामान्य लक्षणे देखील मधुमेहाची लक्षणे असू शकतात. (Diabetes Symptoms)

नेहमीपेक्षा जास्त लघवी (विशेषतः रात्री)

सतत तहान लागणे

खूप थकल्यासारखे वाटणे

प्रयत्न न करता वजन कमी होणे

प्रायव्हेट पार्टजवळ खाज येणे किंवा फोड येणे

कापणे किंवा जखम बरी होण्यास जास्त वेळ लागणे

स्पष्ट दृष्टीचा अभाव

 

त्वचेवरही दिसतात मधुमेहाची ही लक्षणे
तज्ज्ञांच्या मते, ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांमध्ये मधुमेहामुळे काही त्वचेचे विकारही दिसून येतात. या विकाराचा परिणाम रक्तवाहिन्या आणि नसांवर होतो. अकॅन्थोसिस निग्रिकन्स ही स्थिती मधुमेह असलेल्या लोकांमध्ये देखील दिसून येते. ही अशी स्थिती आहे जी त्वचेवर दिसून येते ज्यामुळे त्वचेच्या घडीवर एक मोठा काळा डाग बनतो. हे सहसा मानेच्या मागील बाजूस दिसते.

 

रेगेनलॅब सोबत काम करणार्‍या कॉस्मेटिक डॉक्टर डॉ. ज्युलिएट गुसारोवा यांच्या मते, शरीराच्या वेगवेगळ्या भागात त्वचेच्या घड्या ज्या तळहातावर, काखेत किंवा मानेवर दिसतात त्यांना अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. काही लोक म्हणतात की हा विकार असलेल्या लोकांची त्वचा जाड होते. अकॅन्थोसिस निग्रिकन्सचा उपचार त्याच्या मूळ समस्येप्रमाणे म्हणजे मधुमेह प्रमाणे केला जातो.

श्वासाद्वारे ओळखा मधुमेहाची लक्षणे
जर एखाद्याला मधुमेह असेल, तर त्याचा गोड गंधाचा श्वास डायबेटिक केटोआसिडोसिस (DKA) दर्शवू शकतो.
जर याचा उपचार केला नाहीत तर तो जीव देखील घेऊ शकतो.

 

हे असे तेव्हा होते जेव्हा शरीर केटोसिसमध्ये प्रवेश करते.
ही स्थिती तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती जास्त चरबी वापरते आणि कमी कार्ब आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाते.

 

सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा शरीरात उर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज नसते,
तेव्हा शरीर त्याऐवजी ऊर्जा म्हणून चरबी वापरते. यामुळे किटोन तयार होतात, ज्यामुळे श्वासाचा वास बदलतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Symptoms | type 2 diabetes unusual symptoms type 1 diabetes losing weight sweet breath dark skin tiredness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bone Pain | हाडांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो ‘हा’ भयंकर आजार

 

Ear Wax | पेन्सिल किंवा लोखंडाने कान स्वच्छ करणे धोक्याची घंटा, जाणून घ्या ईयर व्हॅक्स काढण्याची योग्य पद्धत

 

Black Pepper Benefits | तुम्हाला काळी मिरी जेवणात आवडते का? मग जाणून घ्या तिच्या रोजच्या सेवनाने काय होते