Diabetes Warning Signs | हातावर दिसतात डायबिटीजची लक्षणे, तुम्हाला पण शुगरचा आजार नाही ना?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Warning Signs | डायबिटीजच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. डायबिटीज होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त वजन आणि खराब जीवनशैली. डायबिटीजचे 2 प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीजमध्ये, स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिन अजिबात तयार होत नाही, तर टाईप 2 डायबिटीजमध्ये, स्वादुपिंडाद्वारे कमी प्रमाणात इन्सुलिन तयार होते. डायबिटीज असलेल्या 90% लोकांना टाईप 2 डायबिटीज आहे. (Diabetes Warning Signs)

 

त्याची लक्षणे वेळीच ओळखली गेली तर उपचार लवकर सुरू होऊ शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डायबिटीजची काही लक्षणे हातावर देखील दिसतात, ज्यावरून हा आजार ओळखता येतो. डायबिटीजची लक्षणे कोणती लक्षणे हातावर दिसतात? ते जाणून घ्या.

 

स्टडीतून झाला खुलासा
Wiley Clinical healthcare Hub च्या अभ्यासानुसार, डायबिटीजची तक्रार करणार्‍या लोकांच्या हातावर काही लक्षणे दिसतात. जर एखाद्याला डायबिटीज असेल तर त्याच्या नखांभोवतीची त्वचा लाल होते. यासोबतच नखांजवळील त्वचेवरही लक्ष ठेवावे. जर तिच्यातून रक्त येत असेल, आजूबाजूला फोड येत असतील, तरीही हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. (Diabetes Warning Signs)

 

नखांभोवती रक्ताभिसरण नसल्यामुळे, नखांच्या इतर पेशींप्रमाणे मृत होतात. यासोबतच डायबिटीज रुग्णांच्या बोटांमध्येही अशीच लक्षणे दिसतात. डायबिटीज असलेल्या लोकांना फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, ज्यास ओन्कोमायकोसिस म्हटले जाते. जर तुम्हाला ही स्थिती असेल तर तुमची नखे पिवळी पडण्याची आणि तुटण्याची शक्यता असते. पण जर हाताच्या नखांमध्येच लक्षणे दिसत असतील तर ते डायबिटीजचे लक्षण असू शकते.

 

नॅशनल हेल्थ सर्व्हिस म्हणते की, टाईप 2 डायबिटीजचा त्रास असेल तर रात्री वारंवार लघवी होते. जेव्हा शरीरात खूप जास्त साखर असते आणि रक्त किडनीपासून वाचण्यासाठी मेहनत करू लागते आणि जास्त लघवी करण्यास भाग पाडते.

 

जर जास्त तहान लागत असेल आणि जास्त लघवी करत असाल तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे नेहमी थकवा जाणवतो आणि ते रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याचे कारणही असू शकते. एनएचएस म्हणते की अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. यामध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वय असणे आणि जास्त वजन असणे यांचा समावेश आहे.

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
मँचेस्टर विद्यापीठाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की 2018 आणि 2019 दरम्यान इंग्लंडमध्ये टाईप 2 डायबिटीज रोगामध्ये 7 टक्के घट झाली आहे. मधुमेहींना त्यांच्यातील ग्लुकोजची पातळी सामान्य श्रेणीत ठेवण्यासाठी ते काय खातात यावर विशेष लक्ष द्यावे लागते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, रक्तातील साखरेची उच्च पातळी डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस (DKA) सारख्या जीवघेण्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे डायबेटिक कोमा होऊ शकतो.

 

टाईप 2 डायबिटीजची मुख्य लक्षणे (Symptoms Of tType 2 Diabetes)

– नेहमीपेक्षा जास्त लघवी होणे
– सतत तहान लागणे
– खूप थकल्यासारखे वाटणे
– अचानक वजन कमी होणे
– प्रायव्हेट पार्टला खाज सुटणे
– हळूहळू जखम भरणे
– स्पष्ट न दिसणे

 

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळली तर डायबिटीजचा धोका असू शकतो. योग्य माहितीसाठी, डॉक्टरांना भेटा आणि शुगर तपासा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Warning Signs | diabetes warning-signs symptoms you can spot on your hands and nails type 2 diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना