क्रीडाताज्या बातम्या

Diego Maradona | दिवंगत फुटबॉलपट्टू दिएगो मॅराडोना यांच्यावर क्युबाच्या महिलेकडून अत्यंत गंभीर आरोप

ब्युनोस आर्यस : अर्जेंटिनाचे (Argentina) दिवंगत फुटबॉलपट्टू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे. आरोप करणारी महिला क्युबाची (cuban woman) नागरिक आहे. मी 15 वर्षांची असताना मॅराडोना (Diego Maradona) यांनी माझ्यावर बलात्कार केला. तसेच त्यांनी माझे बालपण हिरावून घेतले, असा आरोप या महिलेने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

 

दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांनी आपल्या फुटबॉल कौशल्याने जगभरात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1986 साली अर्जेंटिना जेव्हा विश्वविजयी झाली त्यामध्ये दिएगो मॅराडोना यांचा सिंहाचा वाटा होता. मागच्यावर्षी 25 नोव्हेंबरला मॅराडोना यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) निधन झाले. या महिलेने मॅराडोनावर केलेल्या आरोपांची सध्या चौकशी सुरु आहे. अर्जेंटिनाच्या न्याय मंत्रालयासमोर या महिलेची साक्ष नोंदवण्यात आली.

 

बलात्काराची ही घटना 2001 मध्ये घडली होती. त्यावेळी हि महिला अर्जेंटिनाला गेली होती. पीडित महिला 16 वर्षांची तर मॅराडोना यांचे वय 40 वर्षे होते. त्यावेळी मॅराडोना ड्रग्ज (Drugs) सेवनाची सवय सोडवण्यासाठी क्युबामध्ये आला होता. त्यावेळी महिलेची त्याच्याबरोबर पहिली भेट झाली होती. तेव्हा हवाना येथील क्लिनिकमध्ये मॅराडोनाने आपल्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिची आई शेजारच्या खोलीत होती असे या महिलेने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

 

Web Title :- Diego Maradona | cuban woman says diego maradona raped her when she was a teenager marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button