Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

पोलिसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात अनेक प्रकारची फळे मिळतात, यामध्ये एक बोर सुद्धा आहे. हे छोटे हिरव्या रंगाचे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. चवीला आंबट-गोड असलेले हे फळ शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी12, अँटीऑक्सीडेंट आणि कॅल्शियम सारखी सर्व पोषकतत्व आढळतात. याच्या सेवनाने कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…

वजन कमी करण्यासाठी उपयोगी
यामध्ये कोलेस्ट्रॉल खुप कमी असते, फायबर आणि प्रोटीन भरपूर असते. यामुळे वजन कमी होते.

निरोगी हृदयासाठी
बोरात पोटेशियम भरपूर असते. यात सोडियम कमी असते. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. रक्तदाब नियंत्रित राहतो.

ब्लडप्रेशर नियंत्रित करते
रक्तदाब नियंत्रित करणे आणि उर्जा प्राप्त करण्यासाठी बोर उपयोगी आहे. यासाठी नियमित पिकलेली बोरं सेवन करू शकता.

मजबूत इम्यूनिटी सिस्टम
बोरात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अन्य खनिज पदार्थ असल्याने इम्यूनिटी वाढते.

तणाव कमी होतो
नियमित परंतु कमी प्रमाणात बोरांचे सेवन केल्याने चिंता, तणाव कमी होतो.

पचनशक्ती सुधारते
बोरात फायबर भरपूर असल्याने तसेच सॅपोनिन आणि ट्रायटरपीनोइड असल्याने जेवनातील आवश्यक पोषकतत्व शोषली जातात. पचनशक्त सुधारते.

त्वचा सुंदर होते
बोरात अँटीऑक्सीडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी असल्याने त्वचेवरील सुरकुत्या, मुरूम, डार्क सर्कल या समस्या दूर होतात.

हाडे मजबूत होतात
वय वाढल्याने हाडे कमजोर होतात. अशावेळी हाडे मजबूत ठेवता येऊ शकतात. बोरोंचे सेवन केल्यान ऑस्टियोपोरोसिसची समस्या कमी होते. बोरात कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा चांगली असते.

चांगल्या झोपेसाठी
बोरामध्ये फ्लेवोनॉइड्स म्हणजे सॅपोनिन आणि पॉलीसेकेराइडची मात्रा चांगली असते. यामुळे झोप चांगली लागते.