UPI पेमेंटसाठी आता बॅंक खात्यात पैशाची गरज नाही, करू शकता पेमेंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या संक्रमण काळात अनेकांवर आर्थिक संकट ओढवले असताना अशातच यूपीआय युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम सुरु आहे. भारतातील कोणत्याही यूपीआय अ‍ॅपमध्ये (UPI )आपल्या बँक खात्याचा क्रमांक लिंक करून आपल्याला यूपीआय पेमेंट करता येते. आता तुम्ही म्हणाल, यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन यूपीआयमार्फत पैसे भरण्यासाठी आपल्या बँक खात्यात पैसे असणे गरजेचे आहे का, पण आता त्याची गरज नाही. असा पर्याय तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही बँक खात्यात पैसे नसले तरीही यूपीआय पेमेंट (Digital payment No money in bank account) करू शकता आणि थकबाकी नंतर देऊ शकता. चला तर ते कसे याबाबत जाणून घ्या.

1) ICICI पे लेटर (ICICI PayLater)

आयसीआयसीआय बँकेच्या पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही UPI क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकता. ही योजना एक प्रकारे क्रेडिट कार्ड सारखी आहे. पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही आधी पैसे खर्च करता आणि नंतर ते पैसे बँकेला परत करता येणार आहेत.

कोणाला मिळणार ही सुविधा – ही सेवा फक्त ICICI च्या ग्राहकांना दिली आहे. तुम्ही iMobile, पॉकेट्स वॉलेट किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेऊ शकता. या खात्यामध्ये तुम्ही नोंदणी करताच तुम्हाला pl.mobilenumber@icici असा एक युपीआय आयडी आणि पे लेटर अकाऊंट नंबर मिळेल. या योजनेची खास बाब म्हणजे क्रेडिट सर्व्हिसचा वापर आता तुम्ही युपीआय व्यतिरिक्त इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही करू शकता.

ICICI पे लेटरद्वारे कसं कराल पेमेंट – पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून पेमेंट केलं जातं जेव्हा युपीआय किंवा ICICI इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून समोरचा व्यक्ती पैसे स्वीकारू शकतो. विशेष म्हणजे युपीआयच्या मदतीने तुम्ही अॅमेझॉन, पेटीएम, मोबिक्विक, फ्यूचर पे, फ्लिपकार्ट, फोनपे आदी पेमेंट अॅप देखील वापरता येणार आहेत. या व्यतिरिक्त, यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही आसपासच्या छोट्या दुकानदारांना पैसे देता येणार आहेत. तर पे लेटर खात्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाचा पेमेंट किंवा पर्सन टू पर्सन फंड ट्रान्सफर करू शकत नाही.

2) ई पे लेटर (e-pay- later ) ई पे लेटर नावाची स्टार्ट-अप आयडीएफसी बँकेने सुरु केली आहे. यामध्येही तुम्ही यूपीआय आयडीद्वारे किंवा यूपीआय क्यूआर कोड स्कॅनद्वारे पैसे देऊ शकता. हे खातं कोणत्याही बँकेच्या ग्राहकाद्वारे वापरता येणार आहे.

3) फ्लेक्सपे (Flexpay )- नुकतीच हैदराबादस्थित कंपनी व्हिफिफा इंडिया फायनान्सने (कंपनी Vivifi India Finance ) फ्लेक्सपे योजना सुरू केली आहे. यामुळे यूपीआयमध्ये क्रेडिटचा (Credit on UPI) पर्याय मिळू शकतो. फ्लेक्सपे ग्राहक नंतर कंपनीची थकबाकी अदा करु शकणार आहेत.

4) मनीटॅप (Moneytap) सीपीआयआय सुविधा- फिनटेक कंपनीदेखील आपल्या ग्राहकांना मनीटॅप यूपीआय किंवा सीपीआयआयवर क्रेडिट देते. ग्राहक ऑनलाइन किंवा ऑफलाइन यूपीआय पेमेंटसाठी युपीआय पेमेंटचा वापर करू शकतात.