Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dinkar Raikar Passes Away | गेली ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर Dinkar Raikar (वय ७९) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्वात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दिनकर रायकर यांना डेंग्यु आणि कोरोनाची लागण झाली होती. डेंग्यु बरा झाला.  लंग्ज इन्फेक्शन अधिक असल्याने त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, पहाटेपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व पहाटे ३ वाजता त्यांचे निधन झाले. (Dinkar Raikar Passes Away)

दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याने ते इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयातच राहत होते. डीटीपी  ऑपरेटर, वार्ताहर, उपसंपादक असा यशस्वी प्रवास त्यांनी एक्सप्रेस समुहात केला. लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची (Dinkar Raikar Lokmat) जबाबदारी स्वीकारली होती. गेली काही वर्षे ते लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. राजकीय व्यक्तींवर खुशखुशीत शैलीत चिमटा काढण्यात त्यांचा हातखंडा होता.

दिनकर रायकर (Dinkar Raikar Passes Away) यांना मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. त्यामुळे राज्यभरातील सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळून परिचय होता. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे ते माजी अध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, पुढारीकार ग. गो. जाधव, पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Web Title : Dinkar Raikar Passes Away | senior journalist dinkar raikar passes away in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे