भोवळ येणं म्हणजे काय ? ‘ही’ त्याची लक्षणं, कारणं अन् उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

भोवण येणं म्हणजे काय ?
भोवळ येणे याला वैद्यकीय भाषेत सिंकोप म्हणतात. भोवळ येणं म्हणजे एक अशी स्थिती आहेत ज्यात काही काळासाठी रुग्णाची शुद्ध हरपते. साधारणपणे या प्रकाराची अनेक कारणं दिसून येतात. बहुतेक सर्व रुग्णांमध्ये भोवळ येण्यामागे एखादे अंतर्गत वैद्यकीय कारण असू शकतं. यामुळं याकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही सेकंदासाठी मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होणं हे भोवळ येण्याचं मूलभूत कारण आहे.

काय आहेत याची लक्षणं ?
– मळमळ
– डोकं हलकं होणं
– हृदयाच्या ठोक्यांची गती बदलणं
– धुरकट किंवा अस्पष्ट दृष्टी
– ताप
– थंड आणि दमट त्वचा

काय आहेत याची कारणं ?
– मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येणं हे प्रमुख कारण आहे.
– हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होणं
– स्ट्रोकमुळं मेंदूला होणारा ऑक्सिजनपुरवठा बंद होणं
– योग्य प्रमाणात रक्त किंवा द्रव पंप न होणं
– रक्तवाहिन्यांची मेंदूला रक्त पुरवठा करण्याची स्थिती नसणं

भोवळ येण्यास कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टी
– अति उष्णतेच्या सानिध्यात बराच काळ असणं
– अति ताण किवा तणाव
– अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता
– डिहायड्रेशन
– अति मद्यसेवन
– न्याहारी न केल्यानं रक्तातील साखर कमी होणं

काय आहेत यावरील उपचार ?

याच्या अंतर्गत कारणांवर याचे उपचार अवलंबून असतात. तरी काही उपचार पुढीलप्रमाणे –
– आहारात बदल
– हृदयविकारावर नियंत्रण
– मधुमेहावर नियंत्रण