युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलीवूडमधील कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांच्या नजरा नेहमीच असतात. आपले आवडते अभिनेते किंवा अभिनेत्री काय करतात, कोठे जातात यावर लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावर तर चाहते आपल्या कलाकाराच्या कामगिरीवर कौतुक करतात, तर त्यांचे कोणते काम किंवा वागणे पटले नाही तर सरळ ट्रोल करायला सुरुवात करतात. बॉलिवुडमध्ये कमी काळात प्रसिद्ध झालेली आणि लाखो तरूणांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री दिशा पटानी चित्रपट किंवा दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या कारणांने चर्चेत असते.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि दिशा यांना एकत्र पाहण्यात आले होते. हे दोघे डिनरसाठी एकत्र गेले होते. दिशा नेहमी टाइगर श्रॉफ सोबत असते. शिवाय टायगर आणि दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जाते. अनेकदा दोघांची नावे जोडण्यातही आली आहेत. मात्र दिशा आदित्य ठाकरेंसोबत दिसल्याने तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली. तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. या नेटकऱ्यांनी दिशाने खुप शांततेत आणि नीट उत्तर दिलं आहे. तिनं आदित्य ठाकरे आणि तिच्यामधील नात्याचा खुलासा केला आहे.

एक मुलगा आणि मुलगी एकत्र डिनर जाऊ शकत नाही का ? मैत्री करताना कधीही लिंगभेद करत नाही. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये फक्त मैत्रीणीच नाहीत, मित्रही आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी असतात. मी माझ्या करियरच्या ज्या टप्प्यावर आहे, तिकडे प्रत्येक जण माझ्याबद्दल अनेक मतं मांडतील, पण मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते, असं दिशाने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, आज आदित्या ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यामुळे दिशाने दोघांमधील नात्याचा खुलासा केला असला तरी नेटकरी तिच्या शुभेच्छांची वाट पाहत आहेत. मात्र दिशाने नेटकऱ्यांना मैत्रीचे नाते असल्याचे सांगत, चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

You might also like