‘दिशा’च्या मृत्यूच्या आधी काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, जवळच्या मित्रानं सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, पण आता त्यांची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यूही वादाचा विषय ठरत आहे. दोन्ही प्रकरणांकडे एकत्र पाहिले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दिशा सॅलियनच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली होती. दिशाने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला असे सांगण्यात आले. पण घटनेच्या दिवशी नेमके काय झाले, हे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले.

दिशा सॅलियनच्या मित्राने घटनेच्या दिवसाविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी दिशाच्या घरी तिचा मंगेतर रोहन, हिमांशू आणि कॉलेजचे दोन मित्र नील आणि दीप हजर होते. त्या रात्री सर्वजण पार्टी करत होते आणि मद्यपान करत होते. पण मद्यपान केल्यावर दिशा खूपच भावूक झाली. ती वारंवार सांगत होती की कोणालाही कोणाचीही पर्वा नाही. आता दिशाच्या या वागण्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण दिशाचे मित्र म्हणतात की मद्यपान केल्यानंतर दिशा असे अनेकदा करायची.

दिशाच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार घरात पार्टी तर सुरूच होती पण रात्री 8 वाजता दिशा तिच्या दुसर्‍या मित्राबरोबर लॉकडाऊननंतर काय करावे, याबद्दल चर्चा करत राहिली. यानंतर दिशाने तिच्या यूकेच्या मित्राशी फोनवर चर्चा केली. नंतर ती रडू लागली, जे पाहून हिमांशू थोडासा रागावला. तो दिशाला रडण्यापासून थांबवत होता कारण अशाने पार्टीचा मूड खराब होत होता.

यानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. जेव्हा दिशाने बराच वेळ दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा तोडला गेला. खोलीच्या आत दिशा नव्हती. पण जेव्हा हिमांशू आणि दीपने खाली पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. सर्वजण ताबडतोब खाली पळाले पण उशीर झाला होता. तो क्षण आठवत मित्राने म्हटले- दिशाच्या हृदयाचा ठोका चालू होता. तिला उचलण्यात आले आणि दीपच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like