सुशांत सिंहच्या मृत्यू नंतर ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाला दिशा सालियनचा फोन ? कुटुंबानं सांगितलं ‘वास्तव’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये कनेक्शन शोधले जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दिशा सालियनचा फोन अ‍ॅक्टिवेट झाला होता, ज्यावर शंका व्यक्त केली जात होती. याबाबत आजतकला माहिती देताना मुंबई पोलीस आणि दिशाच्या आई-वडिलांनी म्हटले की, फोन तपासणीसाठी अ‍ॅक्टिवेट करण्यात आला होता आणि यामध्ये काहीही संशयास्पद नव्हते.

दिशा सालियनचा मृत्यू 8 जूनला रात्री उशीरा झाला होता. तिच्या मृत्यूनंतर सकाळी-सकाळी मुंबई पोलिसांनी तिचा फोन जप्त केला होता. सूत्रांनुसार, कारण दिशाचे आई-वडिल आणि होणारा पती रोहन रॉय यांना कोणावरही संशय नव्हता. यासाठी कायदा आणि प्रोटोकॉलनुसार पोलिसांनी फोन आपल्याकडे ठेवून घेतला.

14 जूनला सुशांत सिंह राजपूतने सुसाईड केली होती. त्याच्या मृत्यूनंतर रात्री ही बातमी आली की त्याची मॅनेजर दिशा सालियनने सुद्धा आठवड्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. अनेकांनी या दोघांच्या मृत्यूचा संबंध जोडण्याचा आणि प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आत्महत्यांमध्ये कनेक्शन असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पोलिसांकडे होता दिशाचा फोन
यासाठी 15 जूनला मालवानी पोलीस अधिकार्‍यांनी दिशाचा होणारा पती रोहन रॉयला बोलावले. यावेळी वरीष्ठ अधिकारी, इन्स्पेक्टरपासून एसीपीपर्यंत सर्वजण उपस्थित होते. यानंतर रोहनच्या समोर दिशा सालियनच्या फोनचे सीलवाले पॅकेट उघडण्यात आले आणि दिशाचे सोशल मीडिया अकाऊंट चेक करण्यात आले. यासाठी पोलिसांना इंटरनेट वापरावे लागले. पोलिसांनी दिशाचे प्रत्येक सोशल अकाऊंट, व्हॉट्सअप, कॉल आणि दुसरी माहिती जमा केली. यासर्वासाठी इंटरनेटचा वापर झाला. हे सर्व रोहनच्या समोर झाले.

पोलिसांच्या फोन चेकिंगदरम्यान जे कॉल दिशाच्या फोनवर आले होते ते केवळ प्रायव्हेट कंपन्यांचे होते, ज्या तिला विमा विकण्यासाठी विचारत होत्या. दिशाने आपल्या मृत्यूपूर्वी जेवढे व्हिडिओ कॉल केले होते, ते सुद्धा तपासण्यात आले. पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी त्या लोकांना पुन्हा कॉल केला.

ही सर्व चेकिंग 2 दिवस सुरू होती. सर्व चेकिंग संपल्यानंतर सर्वांसमक्ष फोन पुन्हा सिल करण्यात आला. 19 जूनला फोन पुढील तपासासाठी एफएसएलला देण्यात आला. कायद्यानुसार पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी दिशा सालियनचा फोन सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू होणे काहीही चूकीचे नाही. दिशाच्या पालकांनी सुद्धा यास दुजोरा दिला आहे.