धुळे : आमदाराच्या घरासमोरच तुफान ‘राडा’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील चौकांत किरकोळ वादातून भांडणे, मारहाण, घरावर दगडफेक करणे अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच चक्क आमदाराच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्यावरून व अपशब्द वापरल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी लाकडी काठ्या, लोखंडी पाईप व गुप्तीने एकमेकांवर वार करण्यात आले. या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. तारिक महम्मद हानिफ (वय 25, रा. इशाक मशीद जवळ, धुळे) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की आमदाराच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्यावरून दोन गटात वादावादी झाली. काही वेळातच वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी लोखंडी पाईप आणि गुप्तीने वार करण्यात आले. यामध्ये तारिक हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांकडून सौम्यबळाचा वापर करण्यात आला. तारिक याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्यांवर आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/