मध्यरात्री २ गटात तुफान राडा ; दगडफेक, चाकूहल्ल्यात ५ जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवजयंतीची सर्वत्र तयारी सुरु असताना शहरात मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन गटात वाद होऊन दगडफेक व चाकू हल्ल्याचा प्रकार झाला. गेंदालाल मिल व बेंडाळे चौक परिसरात एकाचवेळी हा वाद झाला. यात पाच जण जखमी झाले आहेत.

रुपेश संजय सपकाळे (वय २२), नारायण राजू गवळी (वय २६ दोन्ही रा.कांचन नगर), इरफान युनुस शहा (वय १५) मोह्ममद अनीस मा.सलीम (वय १६ रा.सिटी कॉलनी) व आरिफ खान हमीन खान (वय २६, रा.जोशी कॉलनी, जळगाव) अशी या जखमींची नावे आहेत. या सर्वांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबतची माहिती अशी, गेंदालाल मिल भागात काठी मारुन मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोन जणांना लोकांनी पकडून मारहाण केली. त्यामुळे दुसऱ्या गटातील लोकांनी मारहाण करणाऱ्यांवर हल्ला चढविला. त्याचे पडसाद बेंडाळे चौकात उमटले. तिथे ३० ते ३५ जणांचा जमाव एकाच वेळी चालून आला. याचवेळी दगडफेक होऊन चाकूहल्लाही करण्यात आला. त्यात पाच जण जखमी झाले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह चार ठिकाणच्या चौकात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.