खुशखबर ! 14 लाख बँक कर्मचार्‍यांचा एक महिन्याआधीच होणार पगार, मिळणार बोनस देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 14 लाखांपेक्षा अधिक बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक महिना आधी बोनस मिळणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने सर्व सरकारी बँकांना लवकरात लवकर एक महिना आधी ऍडव्हान्स देण्याचे आदेश दिले आहेत. मासिक मानधन आणि दैनिक भत्ता मिळून हे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. आयबीएने सर्व सरकारी बँकांना हे देण्याचे आदेश दिले आहेत.

या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा –
एका रिपोर्टनुसार, एक नोव्हेंबर 2017 पर्यंत बँकेची नोकरी करत असलेले आणि अजूनपर्यंत निवृत्त न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीच हा फायदा मिळणार आहे. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर 2017 ते मार्च 2019 पर्यंत जॉईन केले आहे, त्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या अर्धी रक्कम ऍडव्हान्स म्हणून मिळणार आहे.

बाजारात येईल तेजी –
तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना बोनस रक्कम मिळाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Visit : policenama.com