दीया मिर्झाने आत्महत्या करण्यासाठी घेतली झेलम नदीत उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा हिने आत्महत्या करण्यासाठी झेलम नदीत उडी घेतली. परंतु तेथील तैनात जवानांनी तिला वाचवले. चाहत्यांनी घाबरण्याची काही आवशकता नाही. तिला वाचवले, म्हणून नाही तर हा एक शुटींगचा भाग आहे म्हणून चाहत्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही.

दीया मिर्झा सध्या तिच्या आगामी वेब सीरिजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काफिर असं या वेब सीरिजचं नाव आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारीत ही वेब सीरिज आहे. अभिनेता मोहित रैना हा या वेब सीरिजमध्ये दीयासोबत झळकणार आहे. दीया आणि मोहित हे सध्या सांगला येथे शुटींग करत आहेत.

सांगला हे किन्नौरमधील पर्यटन स्थळ आहे. किनौर येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी सांगला, बटसेरी, कानूरो, खरोगला आणि रक्षम येथे या वेब सीरिजची शुटींग सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून शुटींग सुरु असून टीम खूपच मेहनत घेताना दिसत आहे.

या वेब सीरिजची गोष्ट अशी आहे की, दीया मिर्झा आणि मोहित रैना पाकव्याप्त काश्मीर मध्ये राहत असतात. अशातच अभिनेत्री दीया मिर्झा आत्महत्या करण्यासाठी झेलम नदीमध्ये उडी घेते. परंतु तेथील तैनात भारतीय जवान तिला वाचवतात.