43 वर्ष DMK चे सरचिटणीस असलेले अनबझगन यांचे निधन, दक्षिण भारतातील राजकारणात दु:खाची लाट

चेन्नई : वृत्तसंस्था – 43 वर्षापर्यंत डीएमकेचे महासचिवपद भूषवलेले के. अनबझगन यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी शुक्रवारी रात्री चेन्नईच्या अपोला हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दक्षिण भारताच्या राजकारणात दु:खाची लाट पसरली आहे.

वृद्धावस्थेमुळे के. अनबझगन हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना चेन्नईच्या अपोला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.