कॉफीचे ‘हे’ 5 प्रकार तुम्हालाही माहित नसतील ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – अनेकांना चहा ऐवजी कॉफी पिणं जास्त आवडतं. परंतु काही लोक एकाच प्रकराची कॉफी घेतात. तसं पाहिलं तर कॉफीचे अनेक प्रकार आहेत. याच बद्दल आज जाणून घेऊयात.

1) फिल्टर कॉफी – खूप पाणी आणि काही दूध टाकून चहाप्रमाणेच ही कॉफी तयार केली जाते. दक्षिण भारतात ही कॉफी फेमस आहे. पाश्चिमात्य देशात मात्र कॉफी दूध टाकून तयार केली जाते.

2) एस्प्रेसो कॉफी – यात कॉफी आणि पाणीच असतं. इतर कोणता पदार्थ मिसळला जात नाही. परंतु यासाठी मात्र एस्प्रेसो मशीनची गरज असते.

3) कॅपुचिनो कॉफी – एस्प्रेसोस कॉफीत दूध आणि भरपूर फेम टाकला की, कॅपुचिनो कॉफी तयार होते.

4) लाटे कॉफी – कॅपुचिनो कॉफीत थोडं दूध टाकलं की, लाटे कॉफी तयार होते. इटालियन भाषेत लाटे म्हणजे दूध असा अर्थ होतो.

5) माकियाटो – लाटे आणि माकियाटो या कॉफीत फक्त कलेचा फरक आहे. लाटेमध्ये एस्प्रेसोवर दूध टाकून चमच्याने ढवळलं जातं. तर माकियाटोमध्ये दुधाच्या ग्लासात एस्प्रेसो हळूहळू सोडली जाते.