Coronavirus : गॅरेजमध्ये तंबू टाकून राहतो ‘हा’ डॉक्टर, पत्नी-मुलांना ‘कोरोना’चा धोका होऊ नये म्हणून केलं काम

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरने पत्नी आणि मुलांना धोक्यापासून वाचवण्यासाठी तंबू लावून गॅरेजमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचे आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 30,800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेत या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. डॉक्टर टिम्मी चेंग यांना त्यांचे कुटुंब कोणत्याही धोक्यात येऊ नये अशी इच्छा आहे.

डॉ. चेंग क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी तंबू लावून स्वतःच्या गॅरेजमध्ये राहायला सुरुवात केली आहे. एक ट्वीन मॅट्रेस, लॅपटॉप आणि स्नॅक्ससह ते तंबूत वेळ घालवतात. हॉस्पिटलमध्ये शिफ्ट पूर्ण केल्यानंतर, चेंग तंबूतच राहतात. चेंगने फेसबुकवर लिहिले- ‘मी स्वतः बेघर राहण्याचा निर्णय घेतला कारण मला संसर्ग झाल्यास माझ्या कुटुंबाला संसर्ग होऊ नये.’ त्यांनी सांगितले कि, एक रात्र त्यांनी आपल्या गाडीतच घालविली होती. यानंतर, त्याने पुढील चार रात्री रुग्णालयाच्या कॉल रूममध्ये झोपून घालवले. पाचव्या दिवशी त्यांच्या पत्नीने गॅरेजमध्ये तंबू लावण्याची कल्पना दिली.

डॉ चेंग कॅलिफोर्नियातील इरवीनमधील यूसीआय मेडिकल सेंटरमध्ये काम करतात. चेंगने यांच्या म्हणण्यानुसार कदाचित त्यांना अनेक महिन्यांपर्यंत तंबूत राहावे लागेल कारण अमेरिकेत कोरोना विषाणूचा बळी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांचे कुटुंब त्यांच्यासाठी तंबूत स्नॅक्स आणते, परंतु ते गॅरेजच्या दाराजवळ ठेऊन जातात. त्यांची कार तंबूजवळ उभी आहे आणि ते थेट रुग्णालयात जातात.

डॉ चेंग यांनी आपली कहाणी फेसबुकवर लिहिली आहे. ती हजारो लोकांनी शेअर केली आहे. त्यांनी म्हंटले कि, जर तुमची इच्छा असेल कि, आरोग्यसेवा कर्मचारी बेघर होऊ नये तर आपण आपल्या घरातच रहावे. दरम्यान, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये कोरोनामुळे 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.