डॉ. लेले यांचे अपघाती निधन

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – उत्‍तम धावपटू आणि डॉक्टर संदीप शिवराम लेले (48) याचे शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघातात निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

एक उत्कृष्ट धावपटू आणि प्रसिध्द डॉक्टर म्हणुन डॉ. लेले यांची ओळख होती. ते शनिवारी सकाळी सातारा-पुणे महामार्गावर सायकलिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेजस दूध डेअरी जवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला त्यांच्या सायकलची जबरदस्त धडक बसली. त्या धडकेत डॉ. लेले यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली.

त्यांना तात्काळ सातार्‍यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. लेले यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर अनेक धावपटूंनी आणि त्यांच्या निकटवर्ती यांनी सातारा येथील यशवंत हॉस्पीटलमध्ये त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. डॉ. लेले यांच्या पश्‍चात वडिल, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.