डॉक्टरचं हॉस्पीटलमधील रिसेप्शनिस्टशी ‘लफडं’, पत्नी अन् सासुनं प्रेयसीला मुलांसह ‘जिवंत’ जाळलं

भरतपूर : वृत्तसंस्था – आपल्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेबरोबर पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन महिला डॉक्टर व तिच्या सासूने मायलेकांना पेटवून देऊन जिवंत जाळल्याचा प्रकार भरतपूर येथे घडला. दीपा ऊर्फ रीया (वय २८) व तिचा मुलगा शौर्य (वय ७) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

डॉक्टर पति से नाराज पत्नी ने पति की प्रेमिका और बच्चे को जलाया जिंदा, जानिए पूरा मामला

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. सीमा गुप्ता आणि त्यांची सासू सुरेखा गुप्ता हे गुरुवारी रात्री आग्रा रोडवरील सूर्या कॉलनीत राहणाऱ्या दीपा हिच्या घरी गेल्या. त्यांचे दीपाबरोबर भांडणे झाली. यावेळी या दोघांनी ज्वलनशील पदार्थ घरात टाकून दोघांना पेटवले व घराला बाहेरुन कडी लावली. आग लावल्यानंतर घराबाहेर थांबून दोघी आरडाओरडा करु लागली. आम्ही आग लावली आहे. कोणी वाचवू शकणार असेल तर वाचवा, असे सांगू लागल्या. याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यावर त्यांनी घरात प्रवेश करुन दोघांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, तेथे दोघांचा मृत्यु झाला.

डॉ. सुदीप गुप्ता हे शासकीय हॉस्पिटलमध्ये काम करतात. दीपा ही दोन तीन वर्षांपूर्वी डॉ. सीमा गुप्ता यांच्या काळी बगीचा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती. तेथे असताना तिचा परिचय सीमा गुप्ता यांचे पती डॉ. सुदीप गुप्ता यांच्याशी झाला. या दोघांच्या अनैतिक संबंधामुळे गुप्ता पतीपत्नीत वारंवार भांडणे होत होती. याच कारणावरुन सीमा गुप्ता हिने दीपा हिला कामावरुन काढून टाकले होते.

दीपा ही आपल्या मुलासह पतीपासून वेगळी राहत होती. सुदीप याने सूर्यासिटी येथे दीपा हिला घर घेऊन दिले. त्याच घरात त्याने तिला स्पा सुरु करुन दिले होते. पोलिसांनी सासू सुनांना अटक केली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके