Dog Bites Cases In Pune | पुण्यात आठ महिन्यांत तब्बल १४ हजार श्वानदंश, सुदैवाने एकालाही रेबीज नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dog Bites Cases In Pune | पुणे शहरात श्वानदंशाचे प्रमाण मागील काही महिन्यात वाढले आहे. मात्र, सुदैवाने शहरात रेबीजची लागण झालेली नाही. मागील ८ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यापैकी एकालाही रेबीजची लागण झालेली नाही. (Dog Bites Cases In Pune)

शहरात मागील ३ वर्षांत रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मागील ३ वर्षांमध्ये शहराबाहेर राहात असलेल्या आणि रेबीज झालेल्या ५२ रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. (Dog Bites Cases In Pune)

शहरातील रेबीजची आकडेवारी

२०२१ मध्ये शहरात एकही रेबीजचा रुग्ण आढळला नाही. मात्र, शहरा बाहेरील १४ रेबीज रूग्णांवर उपचार करण्यात आले. या वर्षात एकुण १२०२४ जणांना श्वानदंश झाला.

२०२२ मध्ये शहरात एकही रेबीज रूग्ण आढळला नाही. शहरा बाहेरील २१ रेबीज रूग्णांवर उपचार करण्यात आले. या वर्षात एकुण १६५६९ जणांना श्वानदंश झाला.

तर २०२३ मध्ये शहरात एकही रेबीजचा रुग्ण आढळला नाही. शहरा बाहेरील १७ रेबीज रुग्णांवर उपचार करण्यात आले तर १४०७२ जणांना श्वानदंश झाला आहे. ही आकडेवारी ऑगस्टपर्यंतची आहे.

वर्ष २०२०-२१ मध्ये १४१३७ मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. वर्ष २०२१-२२ मध्ये १३१४८ मोकाट कुत्र्यांची
नसबंदी करण्यात आली. वर्ष २०२२-२३ मध्ये ३११३३ मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली.
वर्ष २०२३-२४ मध्ये १३२१७ मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. ही आकडेवारी जूनपर्यंतची आहे.

शहरातील श्वानदंशाचे प्रमाण आणि रेबीजची माहिती देताना पुणे महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी
डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीमध्ये रेबजीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे.
कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रेबीजचा धोका वाढतो.
शहरात जास्तीत जास्त कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण करण्यासाठी महापालिका विशेष मोहीम राबवत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३६ टक्के
मृत्यू भारतात होतात. यापैकी ९५ टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते.
कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार घ्यावेत, अन्यथा रेबीज हा विषाणूजन्य आजार होऊ शकतो.
रेबीजचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar-Chhagan Bhujbal | ओबीसी बैठकीतील अजित पवारांसोबतच्या वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण, ”एका घरात…”

Sudhir Mungantiwar | भाजपा राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?

Vijay Wadettiwar On Ambadas Danve | ‘दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र’ – विजय वडेट्टीवार