Vijay Wadettiwar On Ambadas Danve | ‘दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र’ – विजय वडेट्टीवार

नागपूर : Vijay Wadettiwar On Ambadas Danve | विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकार एकीकडे सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र (OBC Cast Certificate) देणार नाही, असे म्हणत असले तरी सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे ओबीसी समाजात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (Vijay Wadettiwar On Ambadas Danve)

दरम्यान, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र घेतले आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. (Vijay Wadettiwar On Ambadas Danve)

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. ते सांगत आहेत ओबीसी आरक्षणात कुणाला वाटा देणार नाही, ओबीसी प्रमाणपत्रे देणार नाही, पण एकीकडे ओबीसी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र दिले गेले. जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आली. हे काम झपाट्याने सुरू आहे.

वडेट्टीवार म्हणाले, गुपचूपपणे सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. मग आरक्षणाचा आणि बैठकीचे सोंग सरकार कशाला करत आहे, याचे उत्तर ओबीसी समाजाने विचारले पाहिजे. आरक्षण संपवण्याची पहिली पायरी यशस्वीपणे राज्य सरकारने पार पाडली आहे. कारण शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे या सरकारने कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, मंत्रालयातील कक्ष अधिकारीही मनुवादी विचाराचे बसलेले दिसतील. विशिष्ट विचारधारेचे लोक तहसिल कार्यालयात तहसिलदार म्हणून बसतील. संपूर्ण मेरिट डावलून मर्जीतील लोकांना बसवले जाईल. हा खेळ राज्यात सुरू आहे. हे आमच्या ओबीसी नेत्यांना का कळत नाही हा खरा प्रश्न आहे सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी तरुणांनी करावी.

अंबादास दानवेंनी आरोप फेटाळला

विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे यांनी मराठा असून ओबीसी जात प्रमाणपत्र घेतले असल्याचा दावा केला आहे,
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले,
मी कुठलेही जात प्रमाणपत्र घेतले नाही, त्यामुळे जात वैधतेचा संबंध येत नाही.
विजय वडेट्टीवार यांनी का आरोप केले त्यांना विचारा.

दानवे म्हणाले, ज्यांच्याकडे वंशावळी, नातेवाईकांचे रेकॉर्ड त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहे.
वंशावळीचे प्रमाण असेल तर सर्टिफिकेट मिळते. माझ्याकडे कुठलेही प्रमाणपत्र नाही.
मी कुठल्या समाजाचा नेता नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. मी मराठा, मी ओबीसी असे म्हणणार नाही.
माझी जात माझ्याकडे राहील मी सार्वजनिक का करेन. ज्या बातमीत दम नाही त्याला जाब का विचारू.

अंबादास दानवे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी चुकीची नाही.
परंतु कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण मिळावे. आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल.
कुणबी आणि मराठा फरक आहे. माझ्याकडे पावणे चारशे वर्षापूर्वीचे वंशावळीचे पुरावे आहेत.
परंतु मी प्रमाणपत्र घेतलेले नाही. माझ्या ७ पिढ्यांचे रेकॉर्ड आहेत. मला प्रमाणपत्राची गरज नाही.
मी खुल्या प्रवर्गातून निवडणुका लढलो आहे. मला जातीच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | विधानसभा निवडणुकीसाठी पीएम नरेंद्र मोदी यांच्या 6 दिवसांत 8 सभा