‘बंद’ होणार ‘डॉमिनोज’ पिझ्झा ! गुंडाळणार ‘या’ देशातील ‘व्यवसाय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक मंदीचा परिणाम तुमच्या आवडीच्या खाद्यपदार्थ असलेल्या डॉमिनोज पिझ्झावर होत आहे आणि ही ब्रिटिश कंपनी तोट्यात असल्याने चार देशातील आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

ब्रिटनच्या या सर्वोत मोठ्या पिझ्झा डिलीवरी कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. यात सांगण्यात आले की अत्यंत जास्त नुकसान होत असल्याच्या कारणाने चार देशातील आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. डॉमिनोजच्या या घोषणेनंतर देशातील नागरिकांना झटका लागला आहे, ज्यांना डॉमिनोजचा पिझ्झा आवडतो त्यांच्यासाठी ही नाराजीची बातमी आहे.

या निर्णयासंबंधित डॉमिनोजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी सांगितले की आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो की ज्या देशात आम्हाला तोटा होत आहे तेथे आम्ही प्रतिनिधित्व करणार नाही. आम्ही येथे या व्यवसायातील सर्वश्रेष्ठ मालक नाही.

हा भारतातील लोकांसाठी चिंता करणारा विषय निश्चित नाही कारण डॉमिनोजचा निर्णय भारतात नाही तर स्विझर्लंड, आयसलँड आणि स्वीडन सारख्या देशासंंबंधित आहे. या देशात डॉमिनोजला सतत तोटा होत आहे. ब्रिटनची ही कंपनी मूळ स्वरुपात अमेरिकास्थित Dominos Pizza Inc ची फ्रेंचाइजी कंपनी आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी