Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर 100 कोटी ‘वाया’ गेले नाहीत तर ‘हा’ आहे भारताचा ‘जागतिक प्लॅन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 12 हजार किमीचा प्रवास करुन पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या गुजरातेतील अहमदाबाद शहरात दाखल झाले. ट्रम्प यांच्या स्वागताची भव्य तयारी केली आहे, त्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. परंतु तज्ज्ञांनी मात्र काही वेगळीच मते व्यक्त केली, त्याच्या मते भारत अमेरिका जागतिक प्लॅनवर काम करत आहे त्यासाठी 100 कोटी रुपये काहीच नाहीत.

परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक कमर आगा यांनी सांगितले की, कोणत्याही परदेशी राष्ट्राध्यक्षाचे स्वागत केल्याने पैसे वाया जात नाहीत, ट्रम्प सर्वाधिक शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प खूप कमी वेळा आशियाई देशांच्या दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्प यांचा दौरा भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करतील. अमेरिकेत 40 लाख एनआरआय राहतात. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. 2 हजार अमेरिकी कंपन्या भारतात काम करतात. भारताच्या 200 कंपन्या अमेरिकेत काम करतात. भारत आणि अमेरिकेत 142 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. याचा फायदा देखील भारताला होत आहे असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेसोबत कोणताही व्यापार करार न झाल्यावर देखील कमर आगा यांनी भाष्य केले. भारत आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर मतभेद कायम राहतील. अमेरिकेसोबत व्यापार करार जरी झाला नसला तरी काही गोष्टीवर दोन्ही देशाचं एकमत आहे.दहशतवाद रोखण्यासाठी भारत अमेरिका एकमेकांना सहाय्य करेल. ट्रम्प यांना भारत पाकच्या नापाक करस्थानांबाबत सांगू शकेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानावरुन मोठा करार आहे. भारत अफगाणिस्तानच्या विषयावरुन चिंतेत आहे. हा करार जर झाला तर पाकिस्तान समर्थक तालिबानी दहशतवादी आपला मोर्चा काश्मीरकडे वळवतील याची भीती भारताला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने शांती मिशनांतर्गत त्यांचे सैन्य अफगाणिस्तानात पाठवावे यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे. परंतु भारताने अमेरिकेच्या दबावाखाली येऊ नये. सोव्हियत संघ आणि अमेरिका अफगाणिस्तानात काही करु शकत नसल्याने भारताला पुढे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारताने अफगाण सुरक्षा दलाला प्रशिक्षण देण्याचे काम करावे. अमेरिका अफगाण सुरक्षा दलांना प्रशिक्षण देऊ शकत नाही. भारत हे काम करु शकतो असे कमर यांनी सांगितले.

त्याचसोबत अफगाणिस्तान जागतिक नकाशावर महत्वपूर्ण जागेवर आहेत. म्हणून अमेरिकेसाठी अफगाणिस्तान महत्वाचे आहे. तालिबानसोबत युद्ध नाही तर त्यांची मदत करु अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आणि मध्य आशिया आहे. अमेरिका तालिबानच्या मदतीने इराणला नियंत्रण करु इच्छित आहे. अमेरिकेचे मध्य आशियाई देश तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, कजाखिस्तान अशा देशांमधून एका मोठी पाइपलाइन अफगाणिस्तानच्या मार्गे अरबी समुद्रापर्यंत नेण्याचे स्वप्न आहे. अमेरिकेच्या प्रकल्पामुळे चीन आणि रशियाचा मध्य अशियाई देशातील प्रभाव संपुष्टात येऊ शकतो.