अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलं ‘योगी मॉडेल’, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगी मॉडेल अमेरिकेत चर्चेत आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेलच, पण हे सत्य आहे की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना ‘योगी मॉडेल’ आवडले आहे. युपीच्या योगी मॉडेलचा आवाज लखनौपासून १२,३४६ किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ऐकला जात आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागरिकत्व कायद्याविरूद्ध देशभरात निषेधाच्या नावाखाली दंगेखोरांनी हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड केली. उत्तर प्रदेशातही हिंसाचार झाला होता आणि जागजागी आग लावून वाहने, पोलिस चौकी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले होते. पण अशा घटनांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने नवी सुरुवात केली होती. दंगेखोरांना धडा शिकवण्यासाठी पूर्ण तयारी केली गेली. यूपी सरकारने १०० हून अधिक ठिकाणी पोस्टर्स लावले होते आणि त्यावर दंगेखोरांचे नाव, पत्ता आणि त्यांच्याकडून वसूल करण्याची रक्कम लिहिली गेली होती.

युपीच्या त्या योगी मॉडेलचा आवाज लखनौपासून १२,३४६ किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ऐकू येत आहे. व्हाईट हाऊसजवळील लेफायट्टे स्क्वेअर येथे झालेल्या दंगलीतील १५ आरोपींचे फोटो पोस्टरमध्ये लावण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसजवळील माजी राष्ट्रपती अँड्र्यू जॅक्सन यांचा पुतळा पाडण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दंग्यांच्या वसुलीचे ‘योगी मॉडेल’
यूपीमध्ये सीएएच्या हिंसक प्रदर्शनामध्ये दंगेखोरांना पकडण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केले. त्यानंतर सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेजवरून दंगेखोरांची ओळख पटली. दंगेखोरांकडून वसुलीबाबतचे पोस्टर स्त्यावर लावले गेले. दंगेखोरांना वसुलीची नोटीस पाठवली गेली. दंगेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला. मात्र नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या हिंसाचारातील आरोपींचे पोस्टर्स लावण्याच्या आदेशावर बंदी आणली होती.

आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी जेव्हा ट्रम्प आले होते, तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. हे पोस्टर ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले की, “अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या लोकांवर लेफायट्टे स्क्वेअरमध्ये सार्वजनिक मालमत्ता तोडल्याचा आरोप आहे अशा अनेक लोकांचा शोध सुरू आहे. यात १० वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.”

पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसक निदर्शने झाली होती. या निषेधार्थ आंदोलकांनी पुतळ्यांना दोरी बांधून तोडले. १९ व्या शतकात अध्यक्ष असलेले जॅक्सन यांचे मूळ अमेरिकन लोकांविरुद्ध वागणे चांगले नव्हते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही दंगेखोरांविरोधात यूपीचे योगी मॉडेल स्वीकारले आहे असे दिसते.